हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
‘लव्ह जिहाद’ : हिंदु सून हवी; मात्र हिंदु जावई नको !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद !

मुंबई – ‘विवाह’ आणि ‘निकाह’ यांमध्ये काय अंतर आहे ? हे हिंदु पालकांनी आपल्या मुलांना शिकवलेलेच नाही. मुसलमान युवतींशी विवाह करणार्या हिंदु युवकांची हत्या केली जाते, अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. आता हिंदूंनी बचावात्मक भूमिकेत रहाणे सोडून आपल्या युवतींच्या रक्षणासाठी प्रयत्नरत झाले पाहिजे. गेल्या १ सहस्र ४०० वर्षांपासून हिंदु युवती आणि महिला यांच्या विरोधात जिहाद राबवला जात आहे. हिंदु युवतींना फूस लावून, फसवून ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढणे, त्यांच्याशी विवाह करून नंतर त्यांचा छळ करणे, याने आता सीमा ओलांडली आहे. ‘लव्ह जिहाद’ अंतर्गत निकिता तोमर, तनिष्का शर्मा या युवतींच्या झालेल्या हत्या या हल्लीच्याच घटना जिहादींचे मनोबल वाढवत आहेत. हिंदु युवती आणि महिला यांच्या संदर्भात ‘लव्ह जिहाद’ ही एका राज्याची समस्या नसून राष्ट्रीय समस्या आहे. त्यामुळे संपूर्ण देशभर ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा लागू केला पाहिजे, अशी मागणी गाझियाबाद येथील डासना देवी मंदिराच्या महंत यति मां चेतनानंद सरस्वती यांनी केली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘लव्ह जिहाद’ : हिंदु सून हवी; मात्र हिंदु जावई नको !’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवादात त्या बोलत होत्या.
या परिसंवादात ‘द लीगल हिंदु’ या संघटनेचे सहसंस्थापक आणि राष्ट्रीय समन्वयक श्री. समीर चाकू आणि सनातन संस्थेच्या प्रवक्त्या कु. कृतिका खत्री यांनी त्यांचे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. कार्तिक साळुंके यांनी केले. हा ऑनलाईन कार्यक्रम ४ सहस्र २०० जणांनी पाहिला.
‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्रापासून युवतींना वाचवण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे आवश्यक ! – कु. कृतिका खत्री, प्रवक्ता, सनातन संस्था

विवाहानंतर हिंदु स्त्रियांना ‘अर्धांगिनी’चा दर्जा दिला आहे. ‘लव्ह जिहाद’ हे एक षड्यंत्र असून यांपासून हिंदु युवतींना वाचवण्याची आवश्यकता आहे. याविषयी समाजात जागृती करायला हवी. आपल्या मुलींना धर्मशिक्षण देऊन योग्य संस्कार द्यायला हवेत. साधनेने आपले गमावलेले संतुलन मिळवता येते. जर हिंदु धर्माविषयी युवतींना शिकवले नाही, तर धर्माभिमान नसलेल्या हिंदु युवतींना कुणीही फूस लावून पळवून नेईल. ‘इस्लाम’ काय आहे ? त्यामध्ये महिलांना काय दर्जा आहे ? हे सुद्धा हिंदु युवतींना सांगण्याची आवश्यकता आहे.
‘लव्ह जिहाद’ भारताच्या जनगणनेचे संतुलन बिघडवत आहे ! – समीर चाकू, सहसंस्थापक आणि राष्ट्रीय समन्वयक, ‘द लीगल हिंदु’ संघटना

हिंदु युवतींना जाळ्यात ओढण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ हे सामुदायिक षड्यंत्र आहे. हिंदु असल्याचे भासवून मुसलमान युवक हिंदु युवतींना या षड्यंत्रांतर्गत फसवत आहेत. हिंदु युवतीला मुसलमान युवकाशी शरियत कायद्यानुसार ‘निकाह’च करावा लागतो. या ‘निकाहा’नंतर त्या महिलेला संपत्ती किंवा अन्य अधिकार मिळत नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. हिंदु युवतींशी ‘निकाह’ केल्यावर त्यांचा छळ करून त्यांची हत्या केली जाते, त्यांना वेश्या व्यवसायात पाठवले जाते, अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. ‘लव्ह जिहाद’ भारताच्या जनगणनेचे संतुलन बिघडवत आहे, असे ‘द लीगल हिंदु’ या संघटनेचे सहसंस्थापक आणि राष्ट्रीय समन्वयक श्री. समीर चाकू या वेळी म्हणाले.
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
‘काशीविश्वनाथ सुसज्ज महामार्गा’च्या विकासाआड येणारी याचिका उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाकडून असंमत !
कल्पनेद्वारे नकारात्मकतेला सकारात्मकतेमध्ये पालटणे !
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?