महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन कार्य पुष्कळ आवडले ! – श्री. महेश काळे

रामनाथी, १८ डिसेंबर (वार्ता.) – सुप्रसिद्ध शास्त्रीय आणि सुगम गायक श्री. महेश काळे आणि त्यांचे भाऊ श्री. मंदार काळे यांनी १७ डिसेंबर या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट दिली. या वेळी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात केल्या जाणार्या संशोधन कार्याची ओळख ‘स्पिरिच्युअल रिसर्च फाउंडेशन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाचे संपादक ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. शॉन क्लार्क यांनी करून दिली. श्री. महेश आणि श्री. मंदार काळे यांना आश्रमातील ध्यानमंदिर, कलेशी संबंधित कार्य आणि ‘सनातन प्रभात’ या नियतकालिकांचे कार्य यांविषयीची माहिती महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक आणि ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर अन् श्री. अमोल हंबर्डे यांनी दिली. या वेळी श्री. महेश काळे यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन कार्य पुष्कळ आवडले’, असे सांगितले.
माझ्या सदिच्छा आणि भगवंताचे आशीर्वाद नेहमी तुमच्या कार्याला आहेत ! – श्री. महेश काळे
गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांना नेहमी यश मिळते. तुम्ही केलेले संशोधन आणि शोधकार्य आम्हाला सांगितले, यासाठी धन्यवाद ! माझ्या सदिच्छा आणि भगवंताचे आशीर्वाद नेहमी तुमच्या कार्याला आहेत.
‘आश्रमात प्रवेश केल्यापासूनच येथील वातावरणात सकारात्मक ऊर्जा अनुभवली. या सकारात्मक ऊर्जेचा सर्वांनाच लाभ होऊ दे !
– श्री. मंदार काळे
(श्री. महेश काळे यांच्या आश्रमभेटीचे सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न