१. एस्.एस्.आर्.एफ्. संकेतस्थळाच्या संदर्भातील संख्यात्मक आढावा
१ अ. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्यांची संख्या (ऑक्टोबर २०२१ या मासातील)

२. ‘ऑनलाईन’ प्रसार
अ. ऑक्टोबर २०२१ मध्ये एस्.एस्.आर्.एफ्.च्या ‘फेसबूक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘ट्विटर’, ‘यू ट्यूब’ आणि ‘पिंटरेस्ट’ या सर्व वाहिन्यांच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या अनेक जिज्ञासूंनी साधनेला आरंभ केला आहे.
आ. ऑक्टोबर २०२१ मध्ये १२ सहस्र ४४४ लोकांनी ‘फेसबूक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘ट्विटर’, ‘यू ट्यूब’ आणि ‘पिंटरेस्ट’ या सर्व वाहिन्यांच्या माध्यमातून एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट दिली.
इ. एस्.एस्.आर्.एफ्. च्या ‘फेसबूक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘ट्विटर’, ‘पिंटरेस्ट’ या सर्व वाहिन्यांची ऑक्टोबर २०२१ पर्यंतची एकूण सदस्यसंख्या ३ लक्ष २२ सहस्र ९९ आहे.

३. संकेतस्थळावरील लेख जगातील ७ भाषांमध्ये !
ऑक्टोबर २०२१ मध्ये ‘एस्.एस्.आर्.एफ्’च्या संकेतस्थळावर हिंदी, तमिळ, नेपाळी, चिनी, इटालियन, रशियन आणि क्रोएशियन या ७ भाषांमधील एकूण १३ लेख ठेवण्यात आले.
४. ‘लाईव्ह चॅट’ (संकेतस्थळाला भेट देणार्या जिज्ञासूंशी संवाद साधण्याचे तंत्रज्ञान)
संकेतस्थळावरील लेखांद्वारे हिंदी, इंग्रजी, स्पॅनिश, सर्बाे-क्रोएशियन, फ्रेंच, इंडोनेशियन आणि रशियन या ७ भाषांतील १ सहस्र ७८ वाचकांशी संवाद साधता आला.
५. विविध देशांत घेण्यात आलेली ‘ऑनलाईन’ व्याख्याने आणि कार्यशाळा यांच्या माध्यमातून झालेला व्यापक प्रसार अन् त्यांना जिज्ञासूंचा मिळालेला प्रतिसाद !
अ. ऑक्टोबर २०२१ मध्ये अमेरिका आणि कॅनडा येथे इंग्रजी भाषेत; क्रोएशिया, सर्बिया, रशिया आणि मॅसेडोनिया येथे सर्बियन अन् क्रोएशियन या भाषांत; इंडोनेशिया येथे इंडोनेशियन भाषेत; युनायटेड किंगडम्, फ्रान्स, रोमानिया, हंगेरी, हॉलंड, बेल्जियम, इस्रायल, इस्टोनिया आणि इटली येथे इंग्रजी अन् फ्रेंच या भाषांत; तर बोलिव्हिया, व्हेनेझुएला आणि मेक्सिको येथे स्पॅनिश भाषेत, अशी एकूण ‘ऑनलाईन’ ९ व्याख्याने अन् २ कार्यशाळा घेण्यात आल्या. ८१२ जिज्ञासूंनी या प्रवचनांचा, तर अनेक जिज्ञासूंनी कार्यशाळांचा लाभ घेतला.
आ. ऑक्टोबर २०२१ मध्ये सद्गुरु सिरियाक वाले यांनी २३ ‘ऑनलाईन नामजप सत्रे’ घेतली. यांचा एकूण ५ सहस्र १६७ साधक आणि जिज्ञासू यांनी लाभ घेतला.
६. विविध विभागांत घेण्यात आलेल्या सत्संगांची संख्या

७. जगभरातील एकूण १९५ देशांपैकी (टीप १) १९० देशांत एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ पहाणारे जिज्ञासू आहेत.
(टीप १ – जगभरातील एकूण देशांची संख्या : सध्या जगभरात एकूण १९५ देश आहेत. त्यांतील १९३ देश ‘संयुक्त राष्ट्र संघा’चे सदस्य आहेत. २ देश (‘होली सी’ आणि ‘स्टेट ऑफ पॅलेस्टाइन’) संयुक्त राष्ट्रांत केवळ पर्यवेक्षक आहेत, म्हणजे ‘संयुक्त राष्ट्रां’च्या बैठकांना पर्यवेक्षक म्हणून बसू शकतात. या व्यतिरिक्त ‘संयुक्त राष्ट्रां’च्या ११ व्या सनदी अध्यायात १७ स्वयंशासित नसलेले प्रदेश आहेत. तेथील लोकांना अजून स्वतःचे शासन प्रमाणित केलेले नाही. ‘संयुक्त राष्ट्रां’च्या काही सदस्य देशांकडे अशा प्रदेशांचे प्रशासकीय अधिकार आहेत.)
श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता !’
– (सद्गुरु) सिरियाक वाले, युरोप (नोव्हेंबर २०२१)


‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !