
‘कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र एकत्र असतांना कार्तिकस्वामी दर्शनाचा योग येतो. सर्वसाधारणपणे ‘स्त्रियांनी कार्तिकस्वामींचे दर्शन घेऊ नये’, असे मानले जाते; परंतु या दिवशी स्त्रियांनीही कार्तिकस्वामींचे दर्शन घेतलेले चालते.
या वर्षी गुरुवार, १८.११.२०२१ या दिवशी उत्तररात्री १.२९ पासून १९.११.२०२१ या दिवशी दुपारी २.२८ वाजेपर्यंत कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र आहे. या योगावर कार्तिकस्वामींचे दर्शन घ्यावे. श्री कार्तिकस्वामींचे वाहन मयूर (मोर) आहे. त्याची पूजा करावी. या दिवशी स्नान करून श्री कार्तिकस्वामींचे दर्शन घेऊन दर्भ, चंदन, फुले, दशांगधूप आणि दीप अर्पण करावा. श्री कार्तिकेय स्तोत्राचे पठण करावे. या स्तोत्राला ‘प्रज्ञावर्धन स्तोत्र’ असेही म्हणतात. या स्तोत्राचे मनोभावे पठण केल्याने मनातील नकारात्मक विचार नष्ट होतात आणि बौद्धिक क्षमता वाढते.
षडानन, मुरुगन, महादेवपुत्र, कार्तिकेय, अशा विविध नावांनी श्री कार्तिकस्वामींना ओळखतात. दक्षिण भारतात श्री कार्तिकस्वामींची अनेक मंदिरे आहेत.
कार्तिकस्वामींची दर्शन स्थळे

१. पुणे येथे पर्वतीवर
२. आमराई विसावा जकात नाक्यामागे, पिरवाडी, सातारा.
३. अंभेरी घाट, तालुका खटाव, जिल्हा सातारा.
४. श्री क्षेत्रपाल नरोणा, आळंद, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर.
५. मुळदे, तालुका कुडाळ आणि हिंदळे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग.
६. राजापूर, जिल्हा रत्नागिरी
७. रावणकोंड, गोवा
८. कोल्हापूर – पंचगंगेच्या तिरावर आणि श्री महालक्ष्मी मंदिराच्या आवारात
९. साबरमती, गुजरात
१०. बेल्लारी, कर्नाटक
या व्यतिरिक्त आपल्या गावी किंवा अन्यत्र असलेल्या कार्तिकस्वामींच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे.’
– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित आणि हस्ताक्षर मनोविश्लेषणशास्त्र विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२८.१०.२०२१)
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !
विस्थापित हिंदू : संघर्ष, वेदना आणि पुनर्वसनाची प्रतीक्षा
हिंदु धर्मप्रेमी युवक-युवतींनो, ऋषिमुनी आणि देवता यांनी केलेल्या स्थुलातील कृतीमागील सूक्ष्म धर्मशास्त्र समजून न घेताच त्यांचे अनुकरण करू नका ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ