हिंदूंची मंदिरे अजूनही असुरक्षित ! – संपादक

सावंतवाडी – तालुक्यातील सटवाडी, बांदा येथील श्री सटीदेवी मंदिरातील १० सहस्र रुपये किमतीची पितळेच्या घंटेची चोरी करण्यात आल्याचे १३ ऑक्टोबरला उघडकीस आले. याविषयी बांदा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे.
सटवाडीत गेल्या मासात चोरी करण्याच्या घटना वाढल्या आहेत. यापूर्वी २ दुचाकी चोरण्यात आल्या होत्या; मात्र पोलिसांना अद्याप त्याचा शोध लावता आलेला नाही. मंदिरातील घंटा चोरीला जाण्याची एका मासात ही तिसरी घटना घडली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘पोलिसांनी चोरांना लवकर पकडावे’, अशी मागणी केली जात आहे.
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
मोरजी येथे घर पाडण्याच्या कारवाईच्या वेळी रहिवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न