परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून करवून घेतलेली आदिशक्तीची उपासना !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे सनातनच्या काही साधकांना सूक्ष्मातून उच्च लोकांतील ज्ञान मिळणे

‘गुरुदेवांनी ज्ञानदायिनी आदिशक्तीचा ज्ञानरूपी आशीर्वाद साधकांना मिळवून दिला आहे. त्यामुळे ब्रह्मांडातील विविध लोकांतील ज्ञान पृथ्वीवरील सामान्य साधकांना प्राप्त होत आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने गेली अनेक वर्षे सनातनच्या काही साधकांना ब्रह्मांडातील उच्च लोकांतील ज्ञान प्राप्त होत आहे. ज्ञानाचे माध्यम कुठलेही असले, तरी ज्ञानाचा मूळ स्रोत ईश्वरी आहे. पृथ्वीवरील सनातनच्या सामान्य साधकांना असामान्य असलेले ज्ञान केवळ ज्ञानदायिनी आदिशक्तीमुळे मिळू शकते. सनातनच्या साधकांना हा आशीर्वाद परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे प्राप्त झाला आहे.

श्री. विनायक शानभाग

२. सनातन संस्थेत ‘कविता करणारे, राष्ट्र आणि धर्म यांवर अभ्यासपूर्ण भाष्य करणारे किंवा साधनेच्या विविध पैलूंवर लिखाण करणारे अनेक साधक असणे; कारण त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्री सरस्वतीदेवीचा कृपाशीर्वाद मिळवून दिलेला असणे

एकीकडे सूक्ष्मातील ज्ञान प्राप्त करणारे साधक, गुरुदेवांच्या आज्ञेनुसार ग्रंथांचे संकलन करणारे साधक, तर राष्ट्र आणि धर्म यांवर भाष्य करणारे धर्मपरायण (राष्ट्र आणि धर्म यांच्यावर अभ्यासपूर्ण विवेचन करणारे) साधक, तर दुसरीकडे सनातन संस्थेतील अगदी लहान वयापासून सर्व वयोगटांतील साधकांना श्री सरस्वतीदेवीचा आशीर्वाद लाभला आहे. सनातन संस्थेत ‘कविता करणारे, अनुभूतींचे लिखाण करणारे आणि साधनेच्या विविध पैलूंवर लिखाण करणारे’, सहस्रो प्रतिभावंत साधक सिद्ध झाले आहेत. कालीदासांना देवीचा आशीर्वाद मिळाला, तेव्हा त्यांच्याकडून दैवी लिखाण झाले; मात्र सनातनच्या सर्वसामान्य साधकांना काहीही प्रयत्न न करता गुरुदेवांनी देवीचा आशीर्वाद मिळवून दिला आहे.

‘असे महान गुरु आम्हाला लाभले’, यासाठी आम्ही सर्व साधक गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.

या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।  – श्रीदुर्गासप्तशती, अध्याय ५, श्लोक २०

अर्थ : जी देवी सर्व प्राणीमात्रांमध्ये बुद्धीरूपाने विराजमान आहे, त्या देवीला त्रिवार नमस्कार असो.’

– श्री. विनायक शानभाग, जयपूर, राजस्थान. (१७.९.२०२१)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.