कवर्धा (छत्तीसगड) येथे धर्मांधांनी हिंदूंचा ध्वज काढून फेकल्याने तणाव !

धर्मांधांच्या दगडफेकीत अनेक जण घायाळ

  • छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे तेथे उद्दाम धर्मांधांनी अशी कृती केल्यास आश्‍चर्य ते काय ? अशी धर्महानी रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन करण्याशिवाय पर्याय नाही ! – संपादक
  • हिंदूबहुल भारतात धर्मांधांकडून हिंदूंचा भगवा ध्वज काढून फेकला जातो आणि त्याची विटंबना केली जाते, हे संतापजनक ! – संपादक

पोलिसांची बघ्याची भूमिका !

धर्मांधांचा जमाव भगवा ध्वज काढत असतांना, तसेच परिसरात दगडफेक होत असतांना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, असे लोकांचे म्हणणे आहे. (असे पोलीस भारताचे कि पाकचे ? – संपादक)

(डावीकडे) हिंदूंचा भगवा ध्वज काढताना धर्मांध

कबीरधाम (छत्तीसगड) – धर्मांधांनी कवर्धा येथील कर्मादेवी चौकातील हिंदूंचा भगवा ध्वज काढून फेकला आणि त्या ठिकाणी त्यांचा हिरवा ध्वज लावला. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला. या वेळी धर्मांधांकडून मोठ्या प्रमाणात झालेल्या दगडफेकीत अनेक जण घायाळ झाले. शहरात तणाव कायम असल्यामुळे प्रशासनाने शहरातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे, तसेच सर्व ‘ऑनलाईन’ आणि ‘ऑफलाईन’ परीक्षा रहित करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी अजूनपर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नाही. खबरदारी म्हणून परिसरात कलम १४४ ( ३ किंवा त्याहून अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर प्रतिबंध असणे) लावण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

यासंदर्भात माहिती देतांना पोलिसांनी सांगितले की, ३ ऑक्टोबर या दिवशी एका शांती समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात पुढे धार्मिक सण असल्यामुळे  शांती आणि सद्भाव टिकून रहाण्याच्या दृष्टीने लोहारा चौकापासून धार्मिक ध्वज काढण्यास सांगितले होते. यासाठी बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या दोन्ही धर्मांच्या लोकांनी संमती दिली होती; परंतु घटनास्थळी काही समाजकंटक पोचले आणि त्यांनी उपद्रव केला. एका स्थानिक पत्रकाराने दिलेल्या माहितीप्रमाणे ५ वर्षांपूर्वी याच ठिकाणी भारतमातेचे लावलेले चित्र फाडण्यात आले होते.