कर्नाटकमध्ये धार्मिक स्थळांना संरक्षण देणारे विधेयक संमत

कर्नाटक विधानसभा

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्यातील मंदिरे आणि त्यांच्याशी संबंधित मालमत्ता यांचे संरक्षण करण्यासाठी ‘कर्नाटक धार्मिक स्थळ संरक्षण विधेयक’ विधानसभेत संमत करण्यात आले. काँग्रेसने या विधेयकाला विरोध केला. विधेयकाद्वारे राज्य सरकारला कोणत्याही धार्मिक स्थळाविषयी निर्णय घेण्याचा अधिकार मिळणार आहे. सार्वजनिक ठिकाणी बांधण्यात आलेल्या धार्मिक स्थळांनाही याद्वारे संरक्षण देण्यात आले आहे.