फटाक्यांच्या माध्यमांतून होणारे प्रदूषण न थांबवणार्‍या पोलिसांच्या विरोधात तक्रार करा !

सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत फटाके वाजवण्यास बंदी आहे. फटाके वाजवण्याच्या संदर्भात शासनाची नियमावली असूनही या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. फटाक्यांचा आवाज तर सर्वत्र होतो, तरीही पोलीस त्यावर स्वत:हून कारवाई का करत नाहीत ? कि ते कामचुकारपणा करतात ?

नागरिकहो, आपल्या परिसरात उशिरापर्यंत फटाके वाजवले जात असल्यास अशा ठिकाणांची नावे स्थानिक प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कळवावीत.

https://cpcb.nic.in/uploads/SPCB_Directory.pdf

या लिंकवर सर्व राज्यांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या राज्यस्तरीय कार्यालयांचे पत्ते आहेत.

तसेच नियमबाह्य फटाके वाजवणार्‍यांविरुद्ध नागरिक स्थानिक पोलीस ठाण्यातही तक्रार करू शकतात. स्थानिक पोलीस यांवर कारवाई करत नसल्यास त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार नोंदवावी.

आपण याविषयी काही कृती केली असल्यास अथवा आपल्याला या संदर्भात काही अनुभव आले असल्यास आम्हाला पुढील ई-मेल पत्त्यावर कळवा.

संपर्क क्रमांक : अधिवक्ता नीलेश सांगोलकर, ९५९५९८४८४४

ई-मेल पत्ता : [email protected]