भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची मानसपूजा करत असतांना श्रीकृष्णाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या महानतेविषयी सांगितलेली सूत्रे

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. मानसपूजेच्या वेळी श्रीकृष्णाला नमस्कार करतांना तो मागे सरणे आणि त्याने साधिकेला ‘आधी परात्पर गुरु डॉक्टरांना नमस्कार कर’, असे सांगणे

‘एकदा मी भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची एकत्र मानसपूजा करत होते. मी श्रीकृष्णाला नमस्कार करत असतांना ‘श्रीकृष्ण मागे गेला’, असे मला जाणवले. मी त्याला विचारले, ‘भगवंता, मी नमस्कार करत असतांना तू मागे का गेलास ?’ तेव्हा त्याने उत्तर दिले, ‘तू आधी परात्पर गुरु डॉक्टरांना नमस्कार कर.’

२. ‘माझ्या आधी भगवान श्रीकृष्णाचे स्मरण करा’, असे सांगणार्‍या परात्पर गुरुदेवांची महती भगवान श्रीकृष्णाने सांगून ‘मोजक्या साधकांसह हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय साकार करणे’, हे त्यांचे कार्य अत्यंत महान आहे’, असे म्हणणे

मी श्रीकृष्णाला सांगितले, ‘परात्पर गुरु डॉक्टर ‘माझ्या आधी भगवान श्रीकृष्णाचे स्मरण करा’, असे सांगतात.’ तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, ‘हीच तर त्यांची महानता आहे. ते मला महान म्हणतात; पण खरे महान तेच आहेत. ते म्हणतात, ‘श्रीराम आणि श्रीकृष्ण महान आहेत. ते आदर्श राजे आहेत. त्यांनी आदर्श राज्य केले.’ काही चमत्कार करून आणि काही आदर्श बाळगून आम्ही आमच्या जनतेच्या साहाय्याने राज्य केले. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांच्याकडे काहीच नसतांना काही मोजक्या साधकांसह हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय घेऊन वाटचाल करण्यास प्रारंभ केला आहे. काहीच नसतांना त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात अध्यात्मप्रसार करणे सोपे नाही. त्यासाठी महान असावे लागते, तरच महान कार्य घडते !’

– सौ. साधना अशोक दहातोंडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१०.२०२०)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक