परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेल्या आणि दृष्टी नसतांनाही सतत आनंदी असणार्या जुन्नर, पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती हेमलता भगतआजी (वय ८२ वर्षे) !

१. नीटनेटकेपणा
‘आईंमध्ये नीटनेटकेपणा हा गुण आहे. त्यामुळे त्या प्रतिदिन नीटनेटक्या रहातात. सणाच्या दिवशी त्या आवर्जून ठेवणीतील काठ-पदराच्या साड्या नेसण्यासाठी मागून घेतात.
२. दृष्टी नसतांनाही आनंदी आणि उत्साही रहाणे
वयाच्या ३७ व्या वर्षी आईंची काचबिंदूमुळे दृष्टी गेली, तरीही त्या निराश न होता उत्साहाने आणि आनंदाने दैनंदिन जीवन जगतात. आई घरातील सर्व कामे करण्यासह त्या प्रत्येक सण उत्साहाने साजरा करतात.
३. इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करणे
आई सर्वांचे वाढदिवस लक्षात ठेवतात आणि सर्वांना आवर्जुन शुभेच्छा देतात. साधक घरी आल्यावर आईंना पुष्कळ आनंद होतो. या वयातही त्या सतत इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःही आनंदी रहातात.
४. स्वतःला पालटण्याची तळमळ असणे
आईंकडून एखादी चूक झाल्यास त्या लगेच ती चूक स्वीकारतात आणि ‘माझे चुकले’, असे म्हणतात. त्यांच्यात स्वतःला पालटण्याची तळमळ आहे.
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा
५ अ. परात्पर गुरु डॉक्टरांवर असणार्या श्रद्धेमुळे आईंना भीती न वाटणे : आई मला सांगतात, ‘‘मला एक अनिष्ट शक्ती त्रास देते; परंतु परात्पर गुरु डॉक्टरांचे नाव घेतल्यावर ती पळून जाते. मी त्या अनिष्ट शक्तीला सांगते, ‘तुमच्याकडे परात्पर गुरु डॉक्टर बघतील.’’ परात्पर गुरु डॉक्टरांवर असणार्या श्रद्धेमुळे आईंना तिची भीती वाटत नाही. आईंना परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातून दिसतात आणि त्यांना परात्पर गुरु डॉक्टरांचा आधार वाटतो.
५ आ. परात्पर गुरु डॉक्टरांचे सतत स्मरण करणे : आईंना देवाची आवड आहे. गेली १० वर्षे त्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करत आहेत. सध्या आपत्काळ असल्याने विविध नामजप सांगितले आहेत. ते जाणून घेण्यासाठी आई स्वतः आठवणीने ‘नामजप पालटायचा का ?’, हे विचारतात. त्या सतत परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण करतात.
– सौ. मंजुषा भगत (आजींची सून), जुन्नर, पुणे. (२७.८.२०२०)
६. साधकांना जाणवलेली आजींची गुणवैशिष्ट्ये
६ अ. परिस्थिती आनंदाने स्वीकारणे : ‘आजींचा तोंडावळा नेहमी प्रसन्न असतो. त्यांना ‘डोळ्यांनी दिसत नाही’, याविषयी त्यांची कधीच तक्रार नसते. त्या परिस्थितीचा स्वीकार करून घरातील जमतील तेवढी कामे आनंदाने करतात. ‘नामजप केल्यामुळे मी आनंदी आहे’, असे आजी सांगतात.’
– सौ. स्मिता बोरकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), जुन्नर, पुणे.
६ आ. ओळख नसतांनाही अत्यंत प्रेमाने आणि सहजतेने बोलणे : ‘काही मासांपूर्वी मी सत्संगाच्या निमित्ताने भगतआजींच्या घरी गेले होते. तेव्हा आजींना पाहून मला ‘आजी निर्विचार स्थितीत आहेत’, असे वाटले. आजींनी मला जवळ घेतले तेव्हा त्यांचा स्पर्श पुष्कळ प्रेमळ जाणवला. आधीची ओळख नसतांनाही आजी माझ्याशी अत्यंत प्रेमाने आणि सहजतेने बोलत होत्या.’
– कु. वैभवी भोवर (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), पुणे. (२७.८.२०२०)
|
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांची सद्गुरूंनी केलेली निरीक्षणे
गुरुस्तवन भावांजली : साधकांच्या आध्यात्मिक इच्छा पूर्ण करणारे कामधेनुस्वरूप गुरुदेव !
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात पुणे येथील शास्त्रीय गायक पंडित डॉ. संजय गरूड यांनी सादर केली गायनसेवा !
गुरुस्तवन भावांजली : वैराग्यस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !