‘अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील सौ. नंदा नारायण माने ‘प्रसारसेवा करणे, प्रवचन करणे, जिज्ञासूंना संपर्क करणे’ इत्यादी सेवा करतात. सहसाधिकांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. दीपाली मतकर (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), सोलापूर
१. सेवेची तळमळ
‘सौ. मानेकाकूंचे वय ६६ वर्षे असूनही त्या सेवा करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करतात. सोलापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या सेवेसाठी शारीरिक स्थिती चांगली नसतांनाही काकू अकलूज येथून आल्या होत्या. (सोलापूर ते अकलूज हे अंतर साधारणतः अडीच घंट्यांचे आहे.) पुष्कळ ऊन असूनही काकू घरोघरी सभेच्या प्रसारासाठी जायच्या.
२. कृतज्ञताभाव
‘मला गुरुदेवांच्या कृपेने सेवेला यायला मिळाले. तेच माझ्याकडून सेवा करवून घेतात’, असा त्यांचा कृतज्ञतेचा भाव असतो.
३. ‘काकूंची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे’, असे मला जाणवते.’ (२७.४.२०२१)
सौ. हर्षदा नामदेव जाधव, अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर)
१. प्रेमभाव
‘काकूंनी घरी काही खाऊ बनवला, तर त्या साधक आणि त्यांची मुले यांच्यासाठी तो घेऊन येतात. त्यांना भ्रमणभाष केल्यावर त्या सर्वांची प्रेमाने विचारपूस करतात. कुणी आजारी असेल, तर त्यांची विचारपूस करून काकू त्यांना आधार देतात.
२. साधकांनी सेवा चांगली केली, तर त्या साधकांचे लगेच प्रत्यक्ष किंवा स्वतः भ्रमणभाष करून कौतुक करतात.
३. इतरांचा विचार करणे
काकू घरातील सर्व कामे करून सेवा आणि सत्संग यांसाठी येतात. त्यांच्या यजमानांना संध्याकाळी पाच वाजता चहा हवा असतो. त्यामुळे काकू त्या वेळेत घरी जातात.
४. साधनेची तळमळ
दळणवळण बंदी घोषित होण्यापूर्वी काकू वयाचा विचार न करता ऊन असतांनाही स्वभावदोष-निर्मूलन सत्संग आणि भाववृद्धी सत्संग यांसाठी यायच्या.
५. त्या सेवा वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात.’ (२७.४.२०२१)
साधकांना आधार देणारे आणि उत्तम नेतृत्वगुण असलेले ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. नागेश गाडे (वय ५० वर्षे) !
कर्करोगाच्या व्याधीला सामोरे जातांना साधिका सौ. लता ढवळीकर यांनी अनुभवलेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेचा वर्षाव !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांसाठी व्यष्टी आणि समष्टी स्तरांवर केलेल्या उपायांमागील शास्त्र
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
कौटुंबिक दायित्व खंबीरपणे पार पाडणार्या आणि देवावर श्रद्धा असणार्या कवळे (फोंडा, गोवा) येथील कै. (श्रीमती) आनंदी अनंत नाईक (वय ८५ वर्षे) !
साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा !