
पुणे – तुकडे बंदी कायदा आणि स्थावर संपदा किंवा मालमत्ता विकास अन् नियमन कायद्याचे (रेराचे) उल्लंघन करून झालेल्या दस्त नोंदणीची तपासणी करण्यासाठी दोन पथके नेमली आहेत. राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून याचा अहवाल येत्या १५ दिवसांत राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. तुकडे बंदी आणि रेरा कायद्याचे उल्लंघन करून हवेली क्रमांक १४ कार्यालयात ८३० दस्तांची नोंदणी झाल्याचे उघडकीस आल्याने प्रभारी सहदुय्यम निबंधक एल्.ए. भोसले यांना निलंबित केले आहे.
१. रेरा कायद्यातील तरतुदींप्रमाणे ५०० चौरस मीटर पेक्षा अधिक क्षेत्रावरील बांधकाम प्रकल्पांमध्ये ८ पेक्षा अधिक सदनिका असल्यास संबंधित प्रकल्पांची नोंदणी रेरा प्राधिकरणाकडे करणे बंधनकारक केले आहे.
२. तुकडा बंदी कायद्यानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र ठरवून दिले आहे. सक्षम प्राधिकार्यांची पूर्व अनुमति किंवा ना हरकत पत्र घेतल्याविना संबंधित दस्तांची नोंदणी करता येत नाही; मात्र राज्यात अनेक दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये या कायद्याचे पालन न करताच दस्तनोंदणी झाल्याचे आढळून आले आहे.
३. त्यामुळे संबंधित मालमत्ता या बेकायदा ठरणार आहेत. त्यामुळे नागरिकांची फसवणूक झाल्यास त्यांना न्यायालयाकडे दाद मागता येईल, तसेच मालमत्तेची विक्री करणार्यांकडून दिलेली रक्कम परत घेण्याचा मार्ग उपलब्ध असेल, असे नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
खोपोलीतील श्री भगवान वीरेश्वर मंदिरात चोरी करणार्या चौघांना अटक !
Cyber Crime Coordination Center : महाराष्ट्र सायबर कार्यालय ‘सायबर गुन्हे समन्वय केंद्र’ म्हणून कार्यरत होणार !
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !