
सांगली, १७ ऑगस्ट – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सांगली जिल्ह्यात आयोजित हर घर तिरंगा, घर घर तिरंगा अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यामधील विविध गावे, खेडी, वस्ती यांमधील सार्वजनिक ठिकाणी आणि घरोघरी ध्वजारोहण, भारतमाता पूजन, तिरंगा फेरी, घराघरांवर तिरंगा, असे उपक्रम घेण्यात आले. हे अभियान जिल्ह्यातील १ सहस्र २०० स्थानांवर साजरे करण्यात आले.

यासमवेत राष्ट्रीय कला मंचच्या माध्यमातून आभासी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यात चित्रकला आणि रांगोळी काढणार्या कलाकारांसाठी रंगमाला, वाचन, कथा सादरीकरण यांसाठी शब्दगंध, नृत्य, गायन सादरीकरण, असे कार्यक्रम घेण्यात आले.
भारतासमवेतच्या सीमावादात ब्रिटनला मध्यस्थ बनवू इच्छित नाही ! – Balen Shah
(म्हणे) ‘भारताविरोधात युद्ध पुकारण्याविना कोणताच पर्याय रहाणार नाही !’ – Khawaja Asif
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच
गडकर आळी (सातारा) येथील महिलांनी घातला अधिकार्यांना घेराव !