सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात ८ ऑगस्ट या दिवशी कोरोनाचे ११७ नवीन रुग्ण आढळले. २ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र २६७ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४९ सहस्र ३१६ झाली आहे. ८ ऑगस्ट या दिवशी ९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या ४५ सहस्र ७५१ झाली आहे. सद्य:स्थितीत २ सहस्र २९६ रुग्णांवर उपचार चालू आहेत.