
वाळपई, २९ जुलै (वार्ता.) – सत्तरी तालुक्यात आलेल्या महापुरामध्ये नाणूस वाळपई येथील ‘जय श्रीराम गोसंवर्धन केंद्र’ या गोशाळेवर जीवघेणे संकट कोसळले. महापुरात गोशाळेतील ४२ गोवंशियांचा मृत्यू झाला असून २४ गोवंश गायब आहेत. या महापुरात वाचलेली वासरे आपल्या आईसाठी हंबरडा फोडत आहेत. या महापुरात गोशाळेची १५ लाख रुपयांची हानी झाली आहे.
गोशाळेतील लोकांनी गुरांना वाट मोकळी करून देत पाण्यात अडकलेली ५० वासरे सुरक्षित ठिकाणी नेली. यामध्ये लहान वासरे वाचली; परंतु त्यांच्या आईचा जीव वाचवण्यात यश आले नाही. पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की, त्यात गुरे वाहून जाऊ लागली. या प्रवाहात एकूण ७२ गुरे वाहून गेली.
१ मास उलटूनही गोतस्करांवर कारवाई नाहीच ! – अवधूत धुमाळ, मानद पशूकल्याण अधिकारी
मुसलमानाने केलेल्या प्राणघातक आक्रमणात दुसरा मुसलमान गंभीर घायाळ
अपकीर्तीची धमकी देत १७ लाख रुपयांची खंडणी उकळली : धर्मांध महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा नोंद
‘नीट’ परीक्षेसाठी गोव्यात सर्व केंद्रांवर कडक सुरक्षाव्यवस्था
फोंडा येथील नगरपालिकेच्या भाजी बाजाराच्या प्रवेशद्वारावरील ‘चिकन शॉप’ला पालिकेचे टाळे
न्हैचिआड सड्यावर खाण प्रकल्पासाठी माती परीक्षणाचा डाव ग्रामस्थांनी रोखला