पाकमध्ये धर्मांधाने हिंदु तरुणाला ‘अल्ला हू अकबर’ म्हणण्यास आणि हिंदूंच्या देवतांना शिवीगाळ करण्यास भाग पाडले !

घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर धर्मांधाला अटक !

  • अशा घटनेविषयी भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि पाकप्रेमी का बोलत नाहीत कि ‘झालेली घटना योग्य होती’, असे त्यांना वाटते ?
  • भारतात जमावाकडून एखाद्या मुसलमानाला ‘जय श्रीराम’ म्हणण्यास लावल्याच्या खोट्या बातम्यांवरून हिंदूंना ‘तालिबानी’ म्हणणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, साम्यवादी आदी राजकीय पक्ष आता कुठे आहेत ?
पाकमध्ये धर्मांधाने हिंदु तरुणाला देवतांना शिवीगाळ करण्यास भाग पाडले

इस्लामाबाद (पाकिस्तान) – येथील एका धर्मांधाकडून एका हिंदु तरुणाला ‘अल्ला हू अकबर’ म्हणण्यास आणि हिंदूंच्या देवतांना शिवीगाळ करण्यास भाग पाडल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित झाला आहे. यानंतर पाकमधील विरोधी पक्षांतील हिंदूंच्या नेत्यांनी संताप व्यक्त करत धर्मांधावर कारवाई करण्याची मागणी केली.

हा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर पोलिसांनी अब्दुल सलाम दाऊद याला थारपारकर जिल्ह्यातून अटक केली आहे. पोलिसांनी दाऊद याला अटक केल्याची छायाचित्रे प्रसारित झाली असून त्यात तो पोलिसांशी हात मिळवत आरामात उभा असल्याचे दिसत आहे. (म्हणजे पाक पोलिसांकडून करण्यात आलेली ही कारवाई वरवरचीच आणि हिंदूंच्या डोळ्यांत धूळफेक करणारीच म्हणावी लागेल ! – संपादक)