राज कुंद्रा यांच्या कार्यालयातील भिंतीमध्ये आढळली अश्लील व्हिडिओजशी संबंधित कागदपत्रे !

अश्लील व्हिडिओजच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची सिद्धता

मुंबई – अश्लील चित्रपटांची निर्मिती केल्याप्रकरणी सध्या अटकेत असलेले उद्योगपती राज कुंद्रा यांच्या अंधेरी येथील कार्यालयात पोलिसांनी २४ जुलै या दिवशी धाड टाकली. त्यात अश्लील व्हिडिओजशी संबंधित कागदपत्रे आढळली आहेत. कार्यालयातील एका भिंतीमध्ये ही कागदपत्रे दडवण्यात आली होती. विशेष म्हणजे पोलिसांनी १९ जुलै या दिवशी याच कार्यालयात धाड टाकली होती; मात्र त्या वेळी पोलिसांना काहीच मिळाले नव्हते. एका कर्मचार्‍याने दिलेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी कागदपत्रे कह्यात घेतली आहेत. कागदपत्रांमध्ये अश्लील व्हिडिओज सिद्ध करणार्‍यांच्या साखळीविषयी माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अन्वेषण अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील व्हिडिओजसंदर्भात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करण्याच्या सिद्धतेत होते.