सातारा जिल्ह्यात दळणवळण बंदी शिथील !

२६ जुलैपासून सर्व दुकाने उघडण्यास अनुमती

जिल्हाधिकारी शेखर सिंह

सातारा – सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा ‘पॉझिटीव्हिटी’ दर खाली आला असून जिल्हा तिसर्‍या स्तरावर आला आहे. शासकीय नियमानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी २६ जुलैपासून जिल्ह्यातील दळणवळण बंदी शिथील करत सर्व दुकाने उघडण्यासाठी अनुमती दिली आहे.

नवीन नियमानुसार जिल्ह्यात पहाटे ५ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी, तर सायंकाळी ५ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, शिकवणीवर्ग बंद रहातील. ‘ऑनलाईन’ शिक्षणास अनुमती आहे. अत्यावश्यक दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत चालू रहातील. त्यातीलही औषधांची दुकाने सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत चालू रहातील. इतर सर्व दुकाने आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत चालू रहातील. मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे पूर्णत: बंद रहातील. हॉटेल, रेस्टॉरंट सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेयर्पंत ५० टक्के आसनक्षमतेने चालू रहातील. सर्व खासगी, शासकीय, निमशासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेने चालू रहातील.