समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांचा उत्तरप्रदेशातील लोकसंख्या नियंत्रण कायद्याला विरोध
|

संभल (उत्तरप्रदेश) – येथील समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी राज्यातील भाजप सरकारकडून लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवण्याच्या प्रक्रियेवर टीका केली आहे. ‘अल्ला प्रत्येकाला जन्माला घालतो आणि त्याचे पालनपोषण करतो. व्यक्ती गरीब असो कि श्रीमंत तिचे पोषण होतेच. त्याला विरोध करणे योग्य नाही. यामुळे हानी होईल. हा जनतेच्या हिताचा कायदा नाही’, अशी बिनबुडाची टीका बर्क यांनी केली आहे.
#Watch | #SamajwadiParty’s Shafiqur Rahman reacts to the controversy over #UttarPradesh draft Population Control Bill. pic.twitter.com/fKcSaQWpj2
— TIMES NOW (@TimesNow) July 11, 2021
खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी कायद्याच्या विरोधात मांडलेली सूत्रे
१. जर लोकसंख्या अल्प झाली आणि अशा वेळी शत्रूराष्ट्राने भारतावर आक्रमण केले, तेव्हा काय करणार ? (भारतावर आक्रमण केल्यावर त्याच्या विरोधात बहुसंख्य हिंदूच लढतात. याउलट देशद्रोही कारवाया कोण करतात, हेही भारतियांना ठाऊक आहे. त्यामुळे आक्रमणाची चिंता बर्क यांनी करू नये ! – संपादक)
२. भाजपने जनतेला काहीही दिलेले नाही. आता या कायद्याद्वारे जनतेला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
३. समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न केला जाईल, तेव्हा यावर चर्चा करू. आता काही भाष्य केले जाऊ शकत नाही.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !