
मुंबई – दहिसर येथील गावडे परिसरातील ‘ओम साईराज ज्वेलर्स’ या दागिन्यांच्या दुकानावर दिवसाढवळ्या घुसून ३ युवकांनी दागिन्यांची चोरी केली. या वेळी विरोध करणार्या दुकानाच्या मालकावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. ३० जून या दिवशी ही घटना घडली असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केले आहे.
गोळीबारात मृत्यू झालेल्या दुकानदाराचे नाव शैलेद्र पांडे असे आहे. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढला; मात्र ‘सी.सी.टि.व्ही. फुटेज’ वरून पोलिसांनी एका चोरट्याला अटक केली आहे. पोलिसांकडून अन्य चोरट्यांचा शोध चालू आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
Mohammad Rafiq Naik Arrested: पाकिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करणार्या महंमद रफिक नाईक याला काश्मीरमधून अटक !
MSRTC : स्वच्छतेसाठी जनतेकडून कोट्यवधी रुपये घेऊनही बस आगारांची दुःस्थिती कायम !