यातून सर्वसामान्य जनतेसमवेत पोलिसांचे मनोबल वाढण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, हे लक्षात येते.

पुणे – राजगड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले तरुण पोलीस शिपाई रज्जाक मोहम्मद मणेरी (वय २४) यांनी भोर तालुक्यातील किकवी येथे त्यांच्या रहात्या घरी आत्महत्या केली. याविषयी रज्जाकचे वडील, निवृत्त पोलीस कर्मचारी मोहम्मद मणेरी यांनी राजगड पोलीस ठाण्यात माहिती दिली. रज्जाक गेल्या सहा मासांपासून राजगड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. २१ जून रात्रीपासून ते भ्रमणभाष उचलत नसल्याने वडील आणि नातेवाईक किकवी येथे आले. त्यांच्या घराचा बंद दरवाजा उघडल्यावर त्यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले. घरातील फरशीवर रक्ताने ‘मॉम आय एम् सॉरी’ असे लिहिले होते. ही घटना समजताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
गावात अवैध मद्यविक्री होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येते; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांच्या का लक्षात येत नाही ? अशा पोलिसांना बडतर्फ करा !
अपघातामागील सत्य ४ वर्षांनंतर बाहेर येणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
‘नशामुक्त’ राज्य ?
पनवेल रेल्वेस्थानक परिसरात बेकायदेशीर खाद्यविक्री चालू !
राखीव वनक्षेत्रात शिकार करणार्या ८ जणांना अटक
धर्मांधाचा तरुणीवर अत्याचार