जम्मू-काश्मीरच्या सर्वपक्षीय नेत्यांसमवेत पंतप्रधानांची बैठक !

नवी देहली – जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रहित झाल्यानंतर केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीरमधील राजकीय पक्ष यांच्यात बैठक झाली. २४ जूनला साडेतीन घंटे चाललेल्या बैठकीत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यात येतील, असा निर्णय झाला. सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघांच्या निर्धारीकरणाची प्रक्रिया पूर्ण होताच निवडणुका घेतल्या जातील. यावर सर्वपक्षीयांनी संमती दर्शवली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल, जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, जम्मू-काश्मीरच्या ८ राजकीय पक्षांचे १४ नेते बैठकीला उपस्थित होते. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी मांडण्यात आली.