आज ज्येष्ठ पौर्णिमा (वटपौर्णिमा) या दिवशी पू. संदीप आळशी यांच्या पत्नी सौ. अवनी आळशी यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने पू. संदीप आळशी यांनी त्यांना दिलेल्या काव्यमय शुभेच्छा येथे देत आहोत.

सौ. अवनी संदीप आळशी यांना सनातन परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तीव्र त्रास भोगत असता जरी,
राहे जी सदा हसतमुख ।। १ ।।
गुरुकार्य सत्वर नि परिपूर्ण होण्या,
करी जी नित्य खटपट ।। २ ।।
कलेतील कौशल्य अन् अभिनव कल्पना,
यांसह जी ठेवी लेखनाचीही जाण ।। ३ ।।
त्रासांमुळे पुन्हा पुन्हा कोमेजताही न डगमगे,
‘उपायां’चे शस्त्र परजूनी होई जी पुन्हा सेवारत ।। ४ ।।
गुरुमाऊलीची वाणी, स्मरण अन् शिकवण,
यांनी नेत्र भावचिंब होऊनी जी होई आनंदविभोर ।। ५ ।।
ना प्रगतीची अपेक्षा ना मोक्षाचाही लोभ,
‘गुरुचरणी मिळो विसावा’, हाच जिचा एकचि ध्यास ।। ६ ।।
अशा सौ. अवनीस त्रास असणारे साधकही घालती साद…
लागो सदा गुरुचरणांचा ध्यास ।
राहो अंतरी गुरुचरणांचा वास ।
कधीतरी येईल दया गुरुनाथास ।
मग चरणी सामावून घेईल तो आम्हांस ।।
सौ. अवनी हिस वाढदिनी परात्पर गुरुमाऊली, सद्गुरु, संत आणि साधक यांच्याकडून पुष्कळ आशीर्वाद, शुभेच्छा आणि प्रेम !
– (पू.) संदीप आळशी (२२.६.२०२१)
केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती
समंजस, प्रेमळ आणि देवाची आवड असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा पुणे येथील चि. अच्युत स्वयंप्रकाश बंकापूर (वय ४ वर्षे) !
‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करतांना जीवनात घडणार्या कठीण प्रसंगांकडे साधना म्हणून कसे बघावे ?’, याविषयी देवाने साधिकेला सुचवलेले विचार !
आपलेपणाने आणि झोकून देऊन केलेली साधना अन् सेवा हीच गुरुकृपेचे द्वार उघडणारी गुरुकिल्ली ! – पू. शिवाजी वटकर
गुरूंच्या संदर्भातील उपयुक्त दृष्टीकोन !
आनंदसिंधु, प्रेमाचे आगर आणि धैर्याचा महामेरू असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !