हिंदु राष्ट्राविषयी वैचारिक दिशादर्शन करणारे व्यासपीठ… !


‘हिंदु राष्ट्रा’चा वटवृक्ष उभारण्यात राष्ट्र-धर्माभिमुख विचारशक्तीच्या बीजाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या विचारशक्तीला व्यासपीठ देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आठवड्यातून २ वेळा ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवादांचे आयोजन करण्यात येते. हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि स्थापनेची दिशा यांविषयी या परिसंवादातून वैचारिक सुस्पष्टता येते. परिसंवादात सहभागी असलेल्या मान्यवर हिंदुत्वनिष्ठांच्या माध्यमातून ‘हिंदु राष्ट्र स्थापने’साठी वैचारिक दिशादर्शन मिळते. हिंदूंपुढील विविध समस्यांचा ऊहापोह केला जातो. या ‘ऑनलाईन’ परिसंवादाचा सहस्रो धर्मप्रेमी जिज्ञासू लाभ घेत आहेत आणि धर्मकार्यासाठी कृतीशील होत आहेत !

वारकर्यांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्यांचा जाहीर निषेध, तर हिंदुत्वनिष्ठ संतांचा भव्य सन्मान करणार ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
‘गूगल मॅप’ आणि ज्योतिषशास्त्र
कुत्र्याला श्रीकृष्णाच्या रूपात दाखवणार्या महिलेला जामीन देतांना हिंदूंच्या भावनांचा अनादर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा निवाडा !
वारकरी संप्रदायाची वेशभूषा
केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती
तुका आकाशाएवढा…