देवगड तालुक्यातील अनधिकृत वर्ग बंद करण्याच्या शिक्षणाधिकार्यांच्या सूचना

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – जिल्ह्यात अनधिकृतपणे चालू असलेल्या शाळांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार देवगड तालुक्यात अनधिकृतपणे चालू असलेले वर्ग तात्काळ बंद करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात देवगड तालुक्यातील खुडी माध्यमिक विद्यालय, खुडी येथे इयत्ता ८ वीचा वर्ग, बापर्डे येथील यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालयातील ८वी ते १०वी इयत्तांचे वर्ग अनधिकृत आहेत. तरी या अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याची सावधानता विद्यार्थी आणि पालक यांनी बाळगावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी आंबोकर यांनी केले आहे. (सर्व यंत्रणा हाताशी असतांनाही अनधिकृतपणे वर्ग चालू होईपर्यंत प्रशासनाला का समजले नाही ? अनधिकृतपणे वर्ग चालू करणार्यांवर शासनाने कारवाई करावी ! – संपादक)
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !