मुळशी तालुक्यातील आग लागलेल्या आस्थापनाचे मालक कह्यात !

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद !

उरवडे गावाजवळ रासायनिक आस्थापनाला लागलेली आग

पुणे – मुळशी तालुक्यातील उरवडे पिरंगुट एम्.आय.डी.सी. मधील एस्.व्ही.एस्. एक्वा टेक्नॉलॉजी या आस्थापनाचे मालक निकुंज शहा यांना कह्यात घेतले असून त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड विधान कलम ३०४ (२), २८५, २८६ आणि ३४ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. या आस्थापनामध्ये एका आठवड्यापूर्वी छोटी आग लागली असल्याची माहिती स्थानिकांनी दिली; मात्र यानंतरही अशी घटना घडू नये; म्हणून कोणतीही काळजी न घेतल्याने मनुष्यहानी झाली.