मुंबई – छत्रपती संभाजीराजे महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना भेटत आहेत; मात्र सर्वांत महत्त्वाची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात हुकमाची पाने आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाविषयीचा निर्णय त्यांनी घ्यावा, असे आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.