‘RENAISSANCE STATE the unwritten story of the making of Maharashtra’ या पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशक यांच्यावर गुन्हे नोंद करा

  • ‘क्षत्रिय मराठा परिवार कणकवली’ या संघटनेची मागणी

  • छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई यांची अपकीर्ती केल्याचा आरोप

 कणकवली – ‘RENAISSANCE STATE the unwritten story of the making of Maharashtra’ या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप करत या पुस्तकाचे लेखक गिरीश कुबेर, तसेच प्रकाशक यांच्यावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी ‘क्षत्रिय मराठा परिवार कणकवली’ यांच्या वतीने कणकवली पोलीस ठाणे आणि प्रांताधिकारी यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या वेळी क्षत्रिय मराठा परिवार कणकवलीचे तालुका अध्यक्ष सुशांत दळवी, कोकण विभागप्रमुख सुशांत राऊळ, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अमेय मडव, सिंधुदुर्ग जिल्हा विद्यार्थी उपप्रमुख यश सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.