‘ऑनलाईन’ श्री विष्णुतत्त्व जागृती सोहळा पहातांना चेन्नई येथील साधकांना आलेल्या अनुभूती !

अनुभूतींच्या माध्यमातून साधकांना आनंद देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

१७.१२.२०१९ या दिवशी परात्पर गुरु डॉ. यांचा श्री विष्णुतत्त्व जागृती सोहळा झाला. हा सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

(परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. श्री. के. बालाजी

अ. ‘सोहळ्याच्या आरंभी मला ‘सूक्ष्मातून बाळकृष्णाचे रूप सभागृहात सर्वत्र फिरत असून त्यामुळे वातावरणात चैतन्य पसरत आहे’, असे जाणवले.

आ. श्री. विनायक शानभाग शामल वर्णाविषयी सांगत असतांना माझा चालू असलेला नामजप थांबून अनाहतचक्राच्या ठिकाणी आनंद आणि शांती जाणवली.

इ. श्री विष्णुसहस्रनामाचे पठण चालू असतांना मला सूक्ष्मातून श्रीरामाचे दर्शन झाले.’

२. सौ. गीता लक्ष्मी

अ. ‘श्री विष्णुसहस्रनाम चालू असतांना मला सूक्ष्मातून दिसले, ‘श्री गुरुपादुकांच्या समोर एक पणती लावली असून त्याच्या दोन्ही बाजूंना आरंभी २ पणत्या लागल्या. नंतर त्यातून अनेक दिवे निर्माण झाले. श्री गुरुदेव मध्ये असून सर्व दिवे त्यांच्या भोवती वर्तुळाकारात होते.’

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांनाडोळ्यांना न दिसणारे दिसते, तर.    काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकटसर्वांनाच येतील असे नाही. – संपादक