‘ऑनलाईन सेक्स रॅकेट’ बंद कधी ?

‘बॉलीवूड’ छायाचित्रकार नासिर खानला ‘ऑनलाईन सेक्स रॅकेट’ चालवण्याच्या नावाखाली मुंबई पोलिसांनी नुकतीच अटक केली. नासिरने त्याचे नाव करण ठाकूर ठेवले होते. याच नावाने तो ‘रॅकेट’ चालवत होता. मुसलमान हिंदु नावाने हिंदु महिलांवर अत्याचार करण्याचे हे नवीन कारस्थान करत आहेत, असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्र पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागानेही एक ‘रॅकेट’ पकडले. यातून ३ अल्पवयीन मुली आणि एका महिला यांना मुक्त केले. तसेच गत मासात ऑनलाईन चालणारे रॅकेट उद्ध्वस्त करत २ दलालांना अटक केली. त्यांनी बंगाल येथून चाकरीच्या निमित्ताने ३ मुलींना आणले होते. गेल्या मासात देहली पोलिसांनी एक ‘रॅकेट’ उद्ध्वस्त केले. यात अटक करण्यात आलेल्या ४ जणांकडून १०० हून अधिक ‘व्हॉट्सअ‍ॅप’ गट सिद्ध करून त्याद्वारे ग्राहकांशी संपर्क ठेवला जात असे. ही उदाहरणे ऐकल्यावर मन विषण्ण होते. ही केवळ उघड झालेली उदाहरणे असून देशपातळीवर अशी कितीतरी प्रकरणे असतील, याचा विचारही करवत नाही. या घटनांमधून महिला असुरक्षित आहेत, हे पुन्हा अधोरेखित होत आहे.

नासिर खान

दळणवळण बंदीमध्ये जसे अन्य व्यवसाय बंद झाले, तसे बहुतांश ठिकाणचे वेश्या व्यवसायही बंद झाले. यामुळे काही प्रमाणात या विकृतीला आळा बसून ज्या तरुणींना बळजोरीने फसवून या व्यवसायात आणले जात होते, त्यालाही काही प्रमाणात आळा बसला, अशी आशा वाटत होती; पण समाजकंटकांनी यावरही ‘ऑनलाईन’चा मार्ग शोधला. महान भारतीय संस्कृतीत जिथे कुटुंबव्यवस्था, एकपत्नी व्रत या गोष्टी आदर्श असतांना ‘ऑनलाईन सेक्स रॅकेट’ चालणे आणि लोकांनी त्याला पुष्कळ प्रतिसाद देणे, हे समाजातील नीतीमत्ता झपाट्याने रसातळाला चालल्याचे द्योतक आहे.

मुसलमान असतांना हिंदु नाव धारण करून हिंदु युवतींना या जाळ्यात ओढण्याच्या प्रकरणाचे पोलिसांनी अन्वेषण करणे अत्यावश्यक आहे. सर्व यंत्रणा हाताशी असतांना पोलीस हे सर्व का थांबवू शकत नाहीत ? असा प्रश्‍न सामान्यांना पडत आहे. अशा प्रकारची ‘रॅकेट’ चालणे म्हणजे धर्मशिक्षणाच्या अभावामुळे समाजाला लागलेली ही कीड आहे. हिंदु राष्ट्रात अशी ‘रॅकेट’ नसतील.

– श्री. अजय केळकर, कोल्हापूर.