
आत्मबळ वाढवण्यासाठी साधना करणे, हा महत्त्वपूर्ण उपाय आहे. आत्मबळ वाढल्यास व्यक्ती कोरोनासारख्या महामारीतही स्थिर राहू शकते. व्यक्तीला कर्मफलन्यायानुसार प्रारब्ध भोग भोगावे लागतात; परंतु साधना केल्यामुळे प्रारब्ध भोगाची तीव्रता न्यून होते, तसेच ते सुसह्य होते. कोरोनासाठीही साधना करणे, हाच उपाय आहे. कोरोनाच्या बातम्या पाहून अनेकांना ताण येत आहे. या ताणापासून मुक्तता मिळवण्यासाठी नामजप केल्यास लाभ होतो. सध्याच्या काळानुसार नामजप करणे, हीच साधना आहे. नामजप केल्यामुळे मन शांत आणि तणावरहित होते. तसेच नामजपाने मनाची शक्ती वाढते. नामजपासह प्रार्थना केल्याने मन:शांती मिळण्यासह ईश्वराची शक्ती मिळते. याचसमवेत अनिष्ट आणि नकारात्मक शक्ती यांपासून रक्षण होते. त्यामुळे आजपासूनच साधनेला आरंभ करायला हवा.
धर्मशास्त्र काय सांगते ?
नामजपाचे महत्त्व !
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
प्रार्थना करण्यामागील गर्भितार्थ !