९ मे २०२१ या दिवशी कै. (सौ.) सुजाता देवदत्त कुलकर्णी यांचे वर्षश्राद्ध झाले. त्यानिमित्ताने सनातन संस्थेने त्यांच्या जीवनावर आधारित आणि साधकांना मार्गदर्शन करणारे प्रसिद्ध केलेले ग्रंथ !
खडतर जीवनाला स्थिरपणे सामोरे जाऊन साधनेने जीवनमुक्तही होता येते, यांविषयीचे उदाहरण सनातनचा ग्रंथ !
कै. (सौ.) सुजाता देवदत्त कुलकर्णी यांचे खडतर जीवन अन् साधनाप्रवास

आई आणि मुलाचे नाते अनोखे असते. प्रत्येक मुलाचा ‘आई’ हा पहिला गुरु असते. या ग्रंथात सौ. सुजाता कुलकर्णी यांना विवाहानंतर १५ वर्षांनी मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर तिचे अनारोग्य आणि धडपडा स्वभाव यांमुळे मुलीच्या वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत सौ. कुलकर्णी यांना पदोपदी अनंत संकटांना सामोरे जावे लागले. त्या प्रत्येक क्षणी त्यांनी तिची डोळ्यांत तेल घालून घेतलेली काळजी आणि त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यातून त्यांची साधना झाल्याचे सांगणे, हे सर्व मातांसाठी आदर्श आहे. या ग्रंथातून व्यावहारिक गोष्टींतूनही कशी साधना होऊ शकते, हे सर्वांना शिकण्यासारखे आहे.
एखाद्याच्या मृत्यूनंतर त्या घटनेकडे आध्यात्मिक दृष्टीकोनातून कसे पहायचे, हे शिकवणारा सनातनचा ग्रंथ !
कै. (सौ.) सुजाता कुलकर्णी यांच्या मृत्यूत्तर विधींमागील अध्यात्मशास्त्र

प्रत्येकाच्याच जीवनात जवळच्या एखाद्याचा मृत्यू ही अटळ घटना असते. गेली १० वर्षे कुलकर्णी कुटुंबच घर-दार सोडून आश्रमात येऊन राहिले आहेत. त्यामुळे त्यांचा नातेवाइकांशी विशेष संबंध उरला नव्हता. अशा स्थितीत वर्ष २०२० मध्ये ‘कोरोना’ विषाणूमुळे चालू झालेल्या महामारीमुळे चालू झालेल्या आपत्काळातही साधिकांनी सौ. सुजाता कुलकर्णी यांची केलेली भावपूर्ण सेवा, त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे, आलेल्या अनुभूती, मृत्यूनंतर त्यांचे अंत्यविधी सहजतेने कसे पार पडले, अंत्यविधीच्या वेळी आलेल्या विविध आध्यात्मिक अनुभूती इत्यादींतून ‘साधना केल्यास देव विविध माध्यमांतून कसे साहाय्य करतो’, हे शिकायला मिळेल.
कुटुंबियाचा मृत्यू होण्यासारख्या कठीण प्रसंगाला स्थिरपणे तोंड देता येण्यासाठीचा मार्गदर्शक सनातनचा ग्रंथ !
कै. (सौ.) सुजाता देवदत्त कुलकर्णी यांचे शेवटचे आजारपण आणि मृत्यू

नाडीपट्टीवाचक आणि संत यांच्या सांगण्यानुसार वर्ष २०२१ पासून सर्वांनाच भीषण आपत्काळाला तोंड द्यावे लागणार आहे. त्या वेळी नैसर्गिक आपत्ती, महायुद्ध इत्यादींमुळे मोठ्या प्रमाणावर नरसंहार होऊ शकतो. अशा वेळी ‘जवळच्या व्यक्तींचा मृत्यू कसा सहन करायचा ? साधना केल्यास मृत्यूसारख्या कठीण प्रसंगी देव कसे साहाय्य करतो?’, हे या ग्रंथातून शिकायला मिळेल. परीक्षा असली की, आपण त्या विषयाचा अभ्यास करतो. तसे आता येणारा तिसर्या महायुद्धाचा भीषण काळ, ही सर्वांसाठीच मोठी परीक्षा आहे. या परीक्षेच्या सिद्धतेसाठी हा ग्रंथ निश्चितच उपयुक्त ठरेल.
श्राद्धविधीच्या निमित्ताने श्री. देवदत्त कुलकर्णी आणि मुलगी कु. तृप्ती कुलकर्णी यांना वरील ग्रंथ भेट देण्यात आले.
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
गुरुबोध
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. पूनम प्रभुदेसाई (वय ७९ वर्षे) यांचा साधना प्रवास !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असलेल्या आणि शारीरिक त्रासांतही नृत्यकलेतून आनंद मिळवणार्या मडगाव (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (कु.) चांदणी आसोलकर (वय ३१ वर्षे) !
साधकांनो, मनातील अनावश्यक विचार न्यून करण्यासाठी प्रयत्न करून साधना आणि सेवा यांची फलनिष्पत्ती वाढवा !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
श्री राजमातंगी महायज्ञ आणि भारताच्या सुरक्षेसंबंधी अभूतपूर्व निर्णय यांचा परस्परसंबंध !