कोरोनाचे संकट नष्ट होण्यासाठी सिंधी बांधवांचा २४ घंटे अखंड नामजप !

अमृतवेला ट्रस्टच्या वतीने सोलापुरात जप करणारे सिंधी बांधव

सोलापूर – कोरोनाचे संकट नष्ट होण्यासाठी सोलापुरातील ३५० सिंधी बांधव श्री सुखमणी साहिबजी आणि जपजी साहिबजी यांचा जप २४ घंटे करत आहेत. हा जप सोलापुरातील साई गार्डन, नवजीवन हॉल आणि श्री गुरुनानक दरबार येथे चालू आहे. एका केंद्रावर ३ साधक दीड घंटे जप करतात. अशा प्रकारे ३ केंद्रांवरील एकूण ३५० सिंधी बांधव अखंड नामजप करत आहेत.

अमृतवेला ट्रस्टचे संस्थापक गुरुप्रीतसिंग रिंकू वीरजी यांच्या सूचनेनुसार भारतासह जगभरातील ५०० केंद्रांवर हा नामजप करण्यात येत आहे. श्री गुरुनानकदेवजींच्या रूपात श्री गुरुग्रंथसाहिबजी श्री सुखमणी साहिबजी आणि जपजी साहिबजी यांचे अखंडपणे पठण केले जात आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी हरीष कुकरेजा, योगेश रावलानी, इंद्रलाल होतवानी, अमृतवेला ट्रस्ट सोलापूरचे राजू धामेचा परिश्रम घेत आहेत.