महिलांवरील अत्याचार न्यून होण्यासाठी रामराज्याची स्थापना आवश्यक ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

सोलापूर येथे रामनवमीनिमित्त ‘ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्याना’चे आयोजन

सोलापूर, २७ एप्रिल (वार्ता.) – महाराष्ट्रात देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महिलांवरील अत्याचारांची सर्वांत अधिक नोंद झाली आहे. यासाठीच रामराज्याची स्थापन होणे आवश्यक आहे. महिलांसाठी सुरक्षित असे हिंदु राष्ट्र स्थापन करणे ही काळाची आवश्यकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचे जीवन धर्मासाठी समर्पित केले. त्यामुळेच हिंदवी स्वराज्य उभे राहू शकले. आता आपणही हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात समर्पित होण्याचा निश्‍चय केला पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी केले. रामनवमी दिवशी आयोजित ‘ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्याना’त ते बोलत होते. जिल्ह्यातील अनेक धर्मप्रेमींनी या ‘ऑनलाईन शौर्य जागृती व्याख्याना’चा लाभ घेतला.

या वेळी खानविलकर म्हणाले की, सध्या पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून चुकीचा इतिहास शिकवला जात आहे. हिंदु युवतींना फसवले जात आहे, मॉब लिंचिंमधे हिंदु युवकांचा बळी जातो; पण अशा घटनांची कुठेही चर्चा होत नाही. त्यासाठी आता आपणच संघटित व्हायला हवे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शितल पारे यांनी केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी ‘प्रभु श्रीरामचंद्रांचा विजय असो’, ‘जय श्रीराम’, अशा घोषणा देण्यात आल्या.

अभिप्राय

१. श्री. परमेश्‍वर निमडगे – शौर्यजागृती व्याख्यान आणि स्वरक्षणाची प्रात्यक्षिके पाहून उत्साह वाढला. कार्यक्रम पुष्कळ आवडला.

२. श्री. प्रतिक माशाळे – हिंदु राष्ट्राच्या कार्यात आम्ही सहभागी होऊ.

३. कु. अश्‍विनी नंदल – शौर्यजागृती व्याख्यानातून प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाले. या व्याख्यानामुळे सकारात्मकता वाढण्यास साहाय्य झाले.