
‘कोरोना महामारीच्या कालावधीत दळणवळण बंदी असतांना मी घरी होते. तेव्हा मी भ्रमणभाषवरून भावसत्संग ऐकायचे. एकदा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सत्संगात सांगितले, ‘‘बाहेर जरी आपत्काळ असला, तरी सनातनच्या साधकांसाठी तो ‘कृतज्ञताकाळ’ आहे.’’ त्या वेळी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंची वाणी म्हणजे दैवी वाणीच आहे’, असे मला वाटले. देवाने मला प्रतिदिन साधनेचे ध्येय घ्यायला सुचवले. मी प्रतिदिन १० ते १२ स्वयंसूचना सत्रे करणे, गुणात्मक नामजप करणे, दिवसभरात १०० प्रार्थना करणे, तसेच अधिकाधिक वेळ कृतज्ञताभावात राहून ‘घर आश्रम आहे’, असा भाव ठेवणे, असे साधनेचे ध्येय घेतले होते. देवाने माझ्याकडून हे सर्व प्रयत्न करवून घेतले. मला यातून पुष्कळ आनंद मिळाला.’
– सौ. विद्या नलावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१.२०२१)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
‘आपले खरे कुटुंब हे आपले साधक आहेत’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वचनाची साधिकेला आलेली प्रचीती !
राष्ट्रप्रेमी, धर्माभिमानी आणि इतरांना साहाय्य करणारे अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे मुंबई येथील श्री. मुंडाची वेदव्यास पै (वय ९१ वर्षे) !
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या स्थळी सनातन राष्ट्रध्वज फडकवण्याच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे