रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्या आरोपींच्या नातेवाइकांसमवेत मेजवानी केल्याचे प्रकरण उघडकीस !
|
पुणे – रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्या आरोपींच्या नातेवाइकांसमवेत मेजवानी करणार्या उपनिरीक्षकाला निलंबित केले आहे. दीपक माने असे उपनिरीक्षकाचे नाव असून ते गुन्हे शाखेच्या युनिट ४ मध्ये कार्यरत होते. त्यांनी पार्टीत मद्यपान केले होते तसेच मद्यधुंद अवस्थेत नातेवाइकांच्या लहान मुलीसमवेत अश्लील वर्तन करून तिची छेडही काढली. याविषयी एका महिलेने वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रार केली होती. ही गोष्ट खरी असल्याचे उघडकीला आल्यामुळे उपनिरीक्षक दीपक माने याना तात्काळ निलंबित केले आहे.