संत गोदड महाराज यांचे भाकीत

कर्जत (जिल्हा रायगड) – या वर्षी मान्सूनचे आगमन थोडे विलंबाने होईल; परंतु भरपूर पाऊस पडेल. (प्रत्यक्षातही यंदा भरपूर पाऊस पडणार असल्याचे हवामानतज्ञांनी म्हटले आहे ! – संपादक) एप्रिलच्या मध्यानंतर वळवाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. धान्य भरपूर पिकेल, चोर आणि टोळधाड यांपासून त्रास होईल. रोगराई वाढेल, आखातात आग लागेल. तेलंग देशी (आखाती) आग लागेल. युद्धे होतील, राजकारणी लोकांना त्रास होईल. खरीप आणि रब्बी पिके मुबलक प्रमाणात पिकतील. आश्विन आणि कार्तिक मासात देशात अराजकता माजेल, त्याचा जनतेला त्रास होईल, अशी भविष्यवाणी (संवत्सरी) संत गोदड महाराज मंदिरात पुजारी पंढरीनाथ काकडे यांनी केली. प्रत्येक गुढीपाडव्याच्या दिवशी कर्जतचे ग्रामदैवत संत गोदड महाराज यांच्या मंदिरात संवत्सरीचे वाचन केले जाते. संत गोदड महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी भविष्यवाणी करून ठेवली आहे. त्याचे वाचन करण्यात येते. या वेळीही पुजारी, ग्रामस्थ आणि पंच कमिटी यांच्या अनुमतीने मोजक्या पुजार्यांसमवेत हे वाचन करण्यात आले. ‘हे भाकीत तंतोतंत खरे ठरते’, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

संत गोदड महाराज यांचा परिचय
संत गोदड महाराज हे पंढरीच्या विठ्ठलाचे भक्त होते. पंढरीचा पांडुरंग त्यांना प्रसन्न झाला होता. संत परंपरेत त्यांचे स्थान मोठे आहे. त्यांची कर्जत येथे समाधी आहे. कर्जतला ‘धाकटी पंढरी’ म्हटले जाते. त्यांनी शेकडो वर्षांचे भविष्य लिहून ठेवले आहे. त्याला ‘संवत्सरी’ म्हणतात.
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
वारकरी संप्रदायातील घुसखोर ओळखा !
२५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘श्रीरामच स्वतःविषयी बोलत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे