हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या अन्सारी यांना अटक करण्याची भाजपच्या खासदाराची मागणी
हिंदूंच्या मंदिरात कुणी जावे आणि जाऊ नये, याची आचारसंहिता राष्ट्रीय स्तरावर बनवणे आवश्यक झाले आहे. केवळ राजकीय लाभासाठी मंदिरात येणार्या अन्य धर्मियांवर बंदी घालणे अपरिहार्य आहे !
मधुपूर (झारखंड) – काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांनी देवघर येथील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार्या प्रसिद्ध बाबा बैद्यनाथ शिवमंदिरात पूजा केल्याने वाद निर्माण झाला आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी अन्सारी यांना अटक करण्याची मागणी केली आहे. दुबे यांनी म्हटले आहे की, मुसलमानेतर मक्केच्या मशिदीमध्ये जाऊ शकत नाहीत, तर अहिंदू बाबा बैद्यनाथ मंदिरात प्रवेश करू शकत नाहीत. अन्सारी यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. ‘गोमांस भक्षक करणारे मंदिरात कसे प्रवेश करू शकतात ?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
आज ग्लानि हुई कि मेरे सांसद रहते ,बाबा बैद्यनाथ मंदिर के गर्भगृह में कॉंग्रेस विधायक इरफ़ान अंसारी नें पूजा के बहाने ज्योतिर्लिंग को स्पर्शकर अपवित्र करने का प्रयास किया,आस्था के अनुसार मक्का में गैरमुस्लिम का प्रवेश वर्जित है,गर्भगृह में गौमांस भक्षण करने वालों का प्रवेश? pic.twitter.com/oazWb1pyZj
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) April 14, 2021
इरफान अन्सारी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हटले होते की, जेव्हा माझे मन अस्थिर होते, तेव्हा मी बाबा बैद्यनाथ मंदिरात येतो आणि शिर नमवून पूजा करतो. (अन्सारी जर खरोखर शिवभक्त असतील, तर ते जाहीरपणे तसे विधान करतील का ? आणि असे विधान केल्यावर त्यांच्या धर्मबांधवांची प्रतिक्रिया काय असेल, हाही संशोधनाचा विषय असेल ! – संपादक)