कर्नाटकातील स्वामी विश्वात्मनंद सरस्वती यांचे सनातनच्या साधकांना आशीर्वाद !

हरिद्वार (उत्तराखंड) – तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि तुम्ही सदैव निरोगी रहाल. तुमच्यामध्ये आनंद आहे. तुम्ही सर्व सेवा अत्यंत भावपूर्ण करत आहात. तुमच्यासारख्या पवित्र आत्म्यांना भेटून मला आनंद झाला. येथे लोक मागण्यासाठी येतात. तुम्ही देण्यासाठी आला आहात. मागील जन्मी तुम्ही प्रभु श्रीरामचंद्र यांची सेवा केल्याने आता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धर्मप्रसाराची संधी मिळाली आहे. त्यामुळे यापुढे तुम्ही पृथ्वीवर जन्म घेणार नाही. तुम्ही श्रेष्ठ देवदूत बनणार आहात आणि तरीही आवश्यकता भासल्यास जन्म घेतल्यास तुम्ही आमच्यासारख्या संतांच्या रूपात जन्माला याल, असा आशीर्वाद कर्नाटक येथील स्वामी विश्वात्मानंद सरस्वती यांनी सनातनच्या साधकांना दिला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुंभमेळ्याच्या निमित्ताने येथे धर्मजागृती प्रदर्शन गंगानदी समोरील बडे हनुमान मंदिर प्रतिष्ठानच्या आवारात लावण्यात येणार आहे. या प्रदर्शनाच्या जागेचे भूमीपूजन आणि धर्मध्वज पूजन या कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस उपस्थित होते.
भारताचे नवनिर्माण तुमच्या माध्यमातून होणार आहे !
स्वामी विश्वात्मानंद सरस्वती पुढे म्हणाले की, आपण स्वत: काही करत नसतो, देवच आपल्याकडून करवून घेत असतो. धर्मप्रसाराचे कार्य करण्यासाठी तुमची निवड होणे, ही मोठ्या भाग्याची गोष्ट आहे. हे धर्मरक्षणाचे कार्य आहे. तुम्ही पुष्कळ भाग्यशाली आहात. सध्याची युवा पिढी एकीकडे वाया जात असतांना तुम्हा युवकांकडे पाहून पुष्कळ समाधान वाटते. ज्यांची क्षमता असेल, तेच या कार्यात जोडले जाणार आहेत. देवाच्या कृपेने मीही तुमच्या समवेत आहे. गुरुआज्ञेचे पालन करा. भारताचे नवनिर्माण तुमच्या माध्यमातून होणार आहे. प्रत्येक गोष्ट देवाच्या इच्छेनेच होत असते. सुख-दु:ख हा देवाचाच प्रसाद आहे, असाच भाव ठेवावा. हे राष्ट्रच नाही, तर स्वर्ग आणि ग्रह यांठिकाणी जेथे धर्माचे पालन होत नसेल, तेथेही तुम्ही धर्मपालन करण्यासाठी प्रयत्न कराल, असा विश्वास या वेळी त्यांनी व्यक्त केला.
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
UP Poster Row : मथुरा (उत्तरप्रदेश) येथे ‘हृदयात बाबर, मुखात राम’, असा फलक लावल्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते संतप्त !
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था