रामनाथी आश्रमातील साधक श्री. राहुल कुलकर्णी काही कामानिमित्त त्यांच्या गावी गेले असतांना गावातील लोकांमध्ये कोरोनाच्या संदर्भात काळजी घेण्याचा कसा अभाव आहे, याविषयी त्यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. ‘गावातील काही जणांनी मला सांगितले, ‘‘सॅनिटायझर’ने हात धुतल्यावर हातावरचे विषाणू मरतात का ? हे मेलेले विषाणू कुणी पाहिले आहेत का ? यातून ‘सॅनिटायझर’ विकणारे पैसे कमवत आहेत आणि यामुळे आम्ही ते वापरणे बंद केले आहे.’’
२. ‘ज्या वेळी आजार होईल, त्या वेळी तो होईल. त्याचा विचार आता का करायचा ?’
३. एका संप्रदायानुसार साधना करणारा एक मित्र मला म्हणाला, ‘‘कोरोना येणे आणि आजार होणे, हा प्रारब्धाचा भाग आहे. त्यामुळे या आजाराचा फारसा विचार न करता आपण आपले काम करायचे. काळजी करून काही उपयोग नाही. कोरोना ज्याला व्हायचा, त्याला होणार आणि जो त्यामध्ये मरणार, तो मरणारच आहे. ‘सारखे सॅनिटायझर वापरा, सतत हात धुवा’, असे सांगून कोरोना थांबवण्याचा प्रसार करण्याची आवश्यकता नाही.’’
एकूणच लोकांमध्ये कोरोनाची भीती राहिली नाही, तसेच या आजारातून बरे होण्याची टक्केवारी वाढत असल्यामुळे लोकांमध्ये बिनधास्तपणा वाढत चालला आहे.’
– श्री. राहुल कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.११.२०२०)