पुणे – कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही नगर येथील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यातील ६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे पोलीस सध्या घरीच विलगीकरणात आहेत; पण आता कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी पोलिसांना पुन्हा रस्त्यावर बंदोबस्तासाठी यावे लागत आहे. यासंबंधी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी सांगितले की, लस घेतल्यानंतर तिचा परिणाम लगेच होत नाही. त्यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी जावा लागतो.