सातारा, २ मार्च (वार्ता.) – कराड तालुक्यातील उंब्रज येथील एका विद्यालयातील विद्यार्थिनीचा कोरोना अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्याचे वैद्यकीय अधिकारी संजय कुंभार यांनी सांगितले. बाधित झालेल्या विद्यार्थिनीच्या संपर्कातील इतर विद्यार्थिनींचीही कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
येथील मुलींच्या विद्यालयातील एका विद्यार्थिनीची शाळेत शारीरिक तपासणी करतांना तापमान अधिक आढळून आले. त्यामुळे शाळा प्रशासनाने तात्काळ त्या विद्यार्थिनीची कोरोनाची चाचणी करण्याची सूचना केली. त्यानंतर उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २८ फेब्रुवारी या दिवशी विद्यार्थिनीची तिच्या वडिलांची, बहिणीची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी केली.