सीमावाढ भागाच्या विकास आराखड्यासाठी लवकरच निधी मिळणार ! – उदयनराजे भोसले

५१ कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर

उदयनराजे भोसले

 

सातारा, २ मार्च (वार्ता.) – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना सातारा नगरपालिकेने सीमावाढ भागाचा ५१ कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर केला आहे. याविषयी मंत्रीमहोदयांसमवेत सकारात्मक चर्चा झाली आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या अभिवचनाप्रमाणे लवकरच सातारा नगरपालिकेला या कामी ५१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त होईल, अशी माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे दिली.

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत सीमावाढ विकास आराखडा यासमवेत नाविन्यपूर्ण योजनेतून नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी निधी, कास तलाव उंची वाढवण्यासाठी निधी, कास बंदिस्त नळ परियोजनेसाठी निधी, करमुक्तीविषयी शासनाची मान्यता, नवीन विद्युतदाहिनी आदी विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.