५७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला अयोध्या येथील चि. अरिहंत श्रीवास्तव (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अरिहंत श्रीवास्तव एक आहे !

चि. अरिहंत श्रीवास्तव याचा माघ कृष्ण पक्ष चतुर्थी (२.३.२०२१) या दिवशी पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई आणि कुटुंबीय यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ –  परात्पर गुरु डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

चि. अरिहंत श्रीवास्तव

चि. अरिहंत श्रीवास्तव याला पहिल्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. जन्मापूर्वी

१ अ. पहिल्या मुलीच्या जन्माच्या वेळी शस्त्रकर्म अयोग्य झाल्याने आधुनिक वैद्यांनी दुसरे मूल होणार नसल्याचे सांगणे आणि ही ईश्‍वरेच्छा समजून त्यासाठी शस्त्रकर्म न करण्याचे ठरवणे : ‘माझी पहिली कन्या कु. आनंदिता हिचा जन्म शस्त्रकर्म करून झाला होता. तिच्या जन्मानंतर मला पोटाच्या समस्या चालू झाल्या होत्या. त्यासाठी मी लखनौच्या प्रसिद्ध, अनुभवी आणि माझ्या पूर्व परिचित स्त्रीरोगतज्ञांना दाखवले. त्यांनी सांगितले, ‘‘पहिल्या प्रसुतीच्या वेळी शस्त्रकर्म योग्य प्रकारे न झाल्यामुळे तुम्हाला ‘हर्निया’ झाला आहे आणि ‘स्त्री बीजवाहक नलिकेत (फेलोपियनट्यूब) समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे तुम्हाला मूल होण्यात अडचण आहे. मूल होण्यासाठी शस्त्रकर्म करावे लागेल.’’ ते ऐकून मी आणि यजमान यांनी निश्‍चय केला की, ‘परात्पर गुरुदेवांनी आम्हाला एक कन्या दिली आहे. हीच त्यांची मोठी कृपा आहे. आपण शस्त्रकर्म करवून घ्यायचे नाही.’

१ आ. गर्भधारणा झाल्यावर ‘तो श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून मिळालेला ईश्‍वराचा प्रसाद आहे’, असे वाटणे : एप्रिल २०१९ मध्ये परात्पर गुरुदेवांच्या कृपेने श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अयोध्या येथे शुभागमन झाले. त्या ३ – ४ दिवस अयोध्या येथे राहिल्या. मे मासात मला काही समस्या आल्यामुळे मी अयोध्येतील एक स्त्रीरोगतज्ञांना दाखवले. त्यांनी तपासणी करून सांगितले, ‘‘तुम्हाला गर्भधारणा झाली आहे.’’ आमच्यासह आधुनिक वैद्यांनाही ‘अशी समस्या असूनही गर्भधारणा कशी काय झाली ?’, याचे आश्‍चर्य वाटले. आम्हाला वाटले, ‘हा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून मिळालेला ईश्‍वराचा प्रसादच आहे.’

१ इ. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे अल्प कालावधीसाठी अयोध्येत आगमन होणे आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने त्रास न होता चि. अरिहंतचा जन्म होणे : चि. अरिहंत गर्भामध्ये ७ मासांचा असतांना परात्पर गुरुदेवांच्या कृपेने श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे अल्प कालावधीसाठी अयोध्या येथे येणे झाले. दोन्ही सद्गुरु मातांनी मला पुष्कळ आशीर्वाद दिले. त्यांच्या कृपाशीर्वादानेच मला गर्भावस्थेत कोणताही त्रास झाला नाही. १४.१.२०२० या मकरसंक्रांतीच्या दिवशी चि. अरिहंतचा जन्म झाला.’

– सौ. कनुप्रिया श्रीवास्तव (चि. अरिहंतची आई)

२. जन्मानंतर – जन्मानंतर पहिले २० दिवस 

२ अ. ‘जन्मानंतर एका घंट्याच्या आतच त्याने स्वतःचा अंगठा चोखायला चालू केले. सामान्यतः तीन मासांची बाळे असे करतात.

२ आ. सहनशील : १६.१.२०२० या दिवशी त्याला लस देण्यात आली. तेव्हा तो अत्यल्प रडला. आधुनिक वैद्यांनी  सांगितले होते, ‘बाळ रात्री पुष्कळ त्रास देईल’; परंतु तसे काहीही झाले नाही. यावरून लक्षात येते की, तो अत्यंत सहनशील आहे.

२ इ. कुटुंबियांमध्ये परिवर्तन होणे : काही कुटुंबीय पूर्वी आम्हाला साहाय्य करायला पुढे येत नव्हते. अरिहंतच्या जन्मानंतर त्यांच्यामध्ये पुष्कळ परिवर्तन झाले आणि त्यांनी आम्हाला पुष्कळ साहाय्य केले.

२ ई. इतरांच्या मनातील जाणणे : सकाळी ध्यानाच्या वेळी ९.३० वाजता मी त्याच्याजवळ बसून जप करत असे. त्या वेळी तो झोपत होता. तेव्हा मी त्याला सांगत असे, ‘‘१० वाजले की, मला सांग.’’ तेव्हा तो अचूक १० वाजता जागा होत असे आणि थोडेसे रडण्याचा आवाज करत असे. हे अनेक वेळा झाले. जणू ‘त्याला माझे सर्व बोलणे समजत होते’, असे वाटले.

२ उ. जन्मापासून हाताच्या बोटांनी तो विविध मुद्रा करतो.

२ ऊ. जन्मापासूनच त्याच्या देहाच्या विभिन्न भागांवर विविध रंगांचे दैवीकण येतात.’ – सौ. क्षिप्रा जुवेकर (चि. अरिहंतची मावशी)

३. जन्मानंतर – २० दिवस ते ७ मास

३ अ. बालसंतांच्या छायाचित्राकडे रांगत जाऊन नमस्कार करणे : ‘चि. अरिहंतच्या अंथरुणावर डोक्याच्या बाजूला पू. भार्गवराम यांचा ग्रंथ ठेवला होता. तो ५ मासांचा असतांना रांगत रांगत त्या ग्रंथाजवळ जाता होता. तेव्हा असे वाटत होते की, ‘हात जोडून तो त्यांना नमस्कार करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे.’

३ आ. ‘सनातन प्रभात’च्या पाक्षिकातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे श्रीकृष्ण रूपातील चित्र छातीला लावून आनंद व्यक्त करणे : त्याच्या अंथरुणावर ‘सनातन प्रभात’चे एक पाक्षिक चैतन्य मिळण्यासाठी ठेवले आहे. त्याच्या मुखपृष्ठावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे श्रीकृष्ण रूपातील चित्र आहे. तो खेळता खेळता ते उचलून आपल्या छातीला लावत होता आणि बराच वेळ त्याच स्थितीत रहात होता. त्या वेळी तो आनंदी असल्यासारखे वाटत होते.

३ इ. देवतांच्या चित्राकडे पाहून प्रतिसाद देणे : त्याची मोठी बहीण आनंदिता झोपतांना एका उशीवर श्रीकृष्णाचे चित्र आणि दत्ताचा एक लघुग्रंथ आपल्या डोक्याशी ठेवून झोपते. एके दिवशी सकाळी तो खेळत असतांना त्याची दृष्टी त्या चित्रावर पडली. तेव्हा तो हात जोडून ‘ऊं-ऊं’ आवाज करून चित्राशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता.

३ ई. अपरिचितांकडे न जाणे; मात्र श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडे तत्परतेने जाणे : तो अपरिचितांकडे जात नाही. ३१.७.२०२० या दिवशी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ अयोध्या येथे आल्या होत्या. त्यांना पहाताच तो आनंदी झाला आणि तत्परतेने त्यांच्याकडे गेला अन् कडेवर बसून हसू लागला. त्या असेेपर्यंत संधी मिळताच तो त्यांच्याकडे जात होता.’

– सौ. मिथिलेश कुमारी (अरिहंतची आजी, आईची आई)

४. वय – ७ मास ते ११ मास 

४ अ. ‘मी कपडे वाळत घालायला जाते, तेव्हा तोही मला कपडे देऊन ते वाळत घालण्यासाठी साहाय्य करतो.

४ आ. संतांप्रती भाव : मी ध्यानमंदिरात पूजा करत असतांना तोही रांगत माझ्याजवळ यायचा. मी त्याला कडेवर उचलून घेतल्यावर तो दोन्ही हात जोडून प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरुदेव यांच्या छायाचित्रांकडे एकटक पहायचा. त्या वेळी तो शांत आणि स्थिर रहात होता.

४ इ. ऐकण्याची वृत्ती

१. कोणतीही अयोग्य कृती करतांना तो प्रथम माझ्याकडे पहात असे. मी हाताने खुणावून सांगत असे, ‘‘बेटा, असे करायचे नाही’’, तर तो लगेच ऐकत असे.

२. नोव्हेंबर २०२० मध्ये रामनाथी आम्ही आश्रमात गेलो होतो. त्या वेळी तो आमच्यासह यज्ञाला येत होता. तेव्हा त्याला यज्ञवेदीकडे जायचे असायचे. त्याला ‘तिथे जायचे नाही’, असे सांगितल्यावर तो थांबत होता आणि आनंदाने मोठ्या आवाजात ओरडत होता.

४ ई. चालणे आणि धावणे या कृती लवकर शिकणे : आम्ही रामनाथी आश्रमात असतांना तो १० मासांचा होता आणि उभा राहून १ – २ पावले चालू शकत होता. तो तेेथील बालसाधकांसह धावण्याचा प्रयत्न करत होता. तो केवळ १० मासांचा असूनही पुष्कळ चांगले चालणे आणि धावणे शिकला. (सर्वसाधारण मुले १२ – १३ मासांची असतांना चालायला लागतात.)

४ उ. वस्तू ओळखणे : २.१.२०२१ या दिवशी अयोध्येत पुष्कळ थंडी होती. रात्री १० वाजता मी भोजन करत होते. तेव्हा त्याने माझ्या चपला आणून माझ्या पायाजवळ ठेवल्या आणि मला चपला घालण्यासाठी खुणावू लागला. ‘त्या चपला माझ्याच आहेत’, हे त्याने अचूक ओळखले.

४ ऊ. स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करणे : तो आता ११ मासांचा आहे; परंतु तो आपले पायमोजे आणि बूट स्वतःचे स्वतः घालण्याचा प्रयत्न करतो.

४ ए. सतर्कता : काही दिवसांपूर्वी मी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होते. त्या वेळी एक कप्पा (ड्रावर) माझ्याकडून उघडाच राहिला होता. बेसावधपणे मी त्याला धडकून मला दुखापत होऊ शकली असती. एवढ्यात अरिहंत आला. त्याने शांतपणे तो बंद केला आणि निघून गेला.’

५. स्वभावदोष – हट्टीपणा करणे’

– सौ. कनुप्रिया श्रीवास्तव (चि. अरिहंतची आई)


यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

• दैवी कण :  सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे ‘भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन  हे  घटक  असल्याचे  सिद्ध  झाले.  या  घटकांच्या  मूलद्रव्यांच्या  प्रमाणावरून शोधलेले  त्यांचे  ‘फॉर्म्युले’  सध्या  अस्तित्वात  असलेल्या  कोणत्याही  कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात.