खोटी सामाजिक संस्था स्थापन करून विदेशातून धन गोळा करणार्‍या पाद्रयासह ११ जणांवर गुन्हा नोंद

पाद्रयांची गुन्हेगारी वृत्ती ! अशा घटनांविषयी भारतातील प्रसारमाध्यमे मौन बागळतात !

भोपाळ (मध्यप्रदेश) – खोटी सामाजिक संस्था स्थापन करून विदेशी अनुदान मिळणार्‍या अनिल मार्टिन या पाद्रयासह ११ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मार्टिन याने ‘सेंट जॉन इवेन्जिलिकल लूथरन चर्चेस इन मध्यप्रदेश’ या नावाने खोटी संस्था स्थापन केली होती. या नावची एक संस्था राज्यातील छिंदवाडा येथेही आहे. तिच्या नावाने ही बोगस संस्था भोपाळमध्ये बनवण्यात आली होती.