केवळ उत्पन्न नव्हे, तर किती पर्यटकांना येथील सांस्कृतिक वैशिष्ट्यांची ओळख झाली ? याची माहिती आवश्यक !

पर्यटन

आकड्यांचे हे अंकगणित जर बघितले, तर विदेशी पर्यटक आणि त्यांच्याकडून मिळणार्‍या उत्पन्नाचे प्रमाण अन् त्यांचा परस्पर संबंध स्पष्ट दिसून येतो; पण यापैकी किती जणांना भारताचे राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असे महत्त्वाचे ज्ञान झाले ? याची मात्र काहीच माहिती मिळू शकत नाही. किती लोकांनी इथल्या सांस्कृतिक वैशिष्ट्याची ओळख करून घेतली ? हे शिक्षण शिकण्याची आवड किती जणांनी व्यक्त केली ? हे कळायला काही मार्ग नाही. विदेशींचे सोडा, आपल्या देशाच्या पर्यटन व्यवस्थेने किती विदेशी पर्यटकांना भारत, भारतियता, भारताची संस्कृती आणि भारताचे वैशिष्ट्य यांविषयी काही सांगण्याची, त्यांना शिकवण्याची किती प्रमाणात सोय केली ? याचेही काहीच अनुमान करता येण्यासारखे नाही.

(संदर्भ : मासिक अखंड ज्योती, सप्टेंबर २०१२)