अपार कृपा आणि प्रीती यांचा वर्षाव करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !

परात्पर गुरु डॉ. आठवले

साधकांवर कृपेचा वर्षाव करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

१२ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध केलेल्या या लेखाच्या पहिल्या भागात आपण साधिकेच्या साधनेच्या आरंभी काळात परात्पर गुरु डॉ. आठवले  यांच्या कृपेने त्यांना आलेल्या अनुभूती आपण पाहिल्या. आज त्या पुढील सूत्रे पाहूया.

(भाग २)

भाग १ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा –

https://sanatanprabhat.org/marathi/450414.html

डॉ. रूपाली भाटकार

४. वर्ष १९९३ ते १९९८

४ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग बराच काळ मिळणे आणि त्या वेळी ‘चैतन्याचा वर्षाव होत आहे’, असे जाणवणे : ‘या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले मासातून किंवा दोन मासांतून एकदा अभ्यासवर्ग घेण्यासाठी मुंबईहून चारचाकीने गोव्याला येत. ते शुक्रवारी सायंकाळी सावंतवाडीला पोचत आणि तेथे निवास करत. आम्ही गोव्यातील साधक शुक्रवारी रात्री सावंतवाडीला जात असू. तेथील अभ्यासवर्ग शनिवारी आयोजित केलेला असे. अभ्यासवर्ग संपल्यावर आम्ही परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत गोव्याला परत येत असू. परात्पर गुरु डॉक्टर रविवारी पणजी (गोवा) येथेही एक अभ्यासवर्ग घेत असत. पुढचे ३ – ४ दिवस ते साधकांच्या घरी जाऊन त्यांना मार्गदर्शन करत आणि मुंबईला परत जात. माझ्या परम भाग्यामुळे मला त्या काळात परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग मिळाला. ‘इतर साधकांनाही त्यांच्या सत्संगाचा लाभ मिळावा’, या दृष्टीने मी काही वेळा गोव्याला परत जात असतांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या चारचाकीच्या मागे असणार्‍या दुसर्‍या वाहनात बसत असे. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर स्वतःची चारचाकी थांबवून मला तिच्यात बसायला सांगत. त्यामुळे माझ्यावर त्यांच्या चैतन्याचा वर्षाव होत असे. ‘माझे तीव्र प्रारब्ध न्यून करण्यासाठीच ते असे करत असावेत’, असे मला वाटते. माझे भाग्य थोर असल्याने मला प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या सहवासात पुष्कळ काळ शिकण्याची संधी मिळाली. या मनुष्यजन्मात यापेक्षा अन्य काही मूल्यवान असू शकते का ?

४ आ. स्वतःच्या आचरणातून साधकांना अध्यात्म शिकवणे :
परात्पर गुरु डॉक्टरांचे रहाणीमान अत्यंत साधे आहे. सावंतवाडी येथील वास्तव्यात मी स्वतः त्यांचे आचरण पाहिले आहे. त्या वेळी ते स्वतःची कामे, म्हणजेे जेवणाचे ताट धुणे, कपडे धुऊन दोरीवर वाळत घालणे इत्यादी स्वतःच करत असत. ही कामे त्यांनी कधीही साधकांना करू दिली नाहीत. मोकळ्या वेळेत ते आम्हाला कोकणातील विविध संत आणि सिद्धपुरुष यांच्या दर्शनाला घेऊन जात आणि अध्यात्माच्या विविध अंगांची ओळख करून देत. मला अध्यात्माविषयी काहीही ठाऊक नव्हते; पण गुरुदेवांनी स्वतःच्या आचरणातून शिकवून अशा पद्धतीने आमच्या साधनेचा पाया घट्ट करून घेतला.

४ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अहंशून्यता !  

४ इ १. अभ्यासवर्गाच्या वेळी एखाद्या साधकाच्या घरी राहू शकत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सर्व साधकांच्या समवेत एका जुन्या धर्मशाळेतील एका खोलीत रहाणे : एकदा रत्नागिरी येथे परात्पर गुरु डॉक्टरांचा अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला हाता. त्या वेळी आम्ही सर्व साधक तेथील एका जुन्या धर्मशाळेत राहिलो होतो. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर एखाद्या साधकाच्या घरी राहू शकले असते; मात्र तसे न करता त्यांनी साधकांसमवेत निवास केला.

४ इ २. तेथील एका अस्वच्छ स्नानगृहात अंघोळ करणे साधिकेला अशक्य वाटणे; पण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या महान विभूतीने त्याच स्नानगृहात अंघोळ केल्याचे पाहून तिने तेथेच अंघोळ करणे : दुसर्‍या दिवशी आम्हा सर्व साधकांना अत्यंत अंधारलेल्या, दगडी आणि अस्वच्छ अशा स्नानगृहात अंघोळ करायची होती. मला अशा स्नानगृहात अंघोळ करणे अशक्य होते. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘परात्पर गुरु डॉक्टर हे आरोग्य आणि स्वच्छता यांविषयी अत्यंत दक्ष असतात, तसेच ते एक मोठे डॉक्टर आणि महान विभूती आहेत. ते इंग्लंडमधील अत्यंत उच्चभ्रू प्रासादांमध्ये राहिले आहेत. असे असूनही त्यांनी काहीही गार्‍हाणे न करता याच स्नानगृहात अंघोळ केली. या कृतीने त्यांनी आम्हा सर्व साधकांसमोर एक आदर्श निर्माण केला असतांना ‘मी कशासाठी गार्‍हाणे करत
आहे ?’ त्यानंतर मी त्याच स्नानगृहात अंघोळ केली.

५. वर्ष १९९४ – पुष्कळ कौटुंबिक त्रास होत असतांना साधिकेने गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी धुळ्याला जाणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या व्यस्ततेतून वेळ काढून तिला भेटणे आणि त्यांनी सूक्ष्मातून त्यांचा हात तिच्या मस्तकावर ठेवल्यावर तिला शांत वाटणे 

धुळे येथील गुरुपौर्णिमेच्या काळात मला पुष्कळ कौटुंबिक त्रास होता आणि कित्येकदा घरी मारहाणीचे प्रसंगही होत. अशातच मी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी धुळे येथे गेले होते. परात्पर गुरु डॉक्टरांनी कार्यक्रमातील व्यस्ततेतून वेळ काढून माझी भेट घेतली. गुरुदेवांनी त्यांच्या सुंदर कमलनयनांनी माझ्याकडे अपार कृपेने पाहिले. त्यांच्या स्नेहपूर्ण बोलण्यातून ‘तुला होणार्‍या त्रासाविषयी मला सर्व ठाऊक आहे’, असे ते सांगत आहेत’, असे मला जाणवले. त्यांनी सूक्ष्मातून
माझ्या मस्तकावर त्यांचे करकमल ठेवल्यानंतर मला पुष्कळ शांत वाटले.

६. वर्ष १९९५   पहाटे प.पू. भक्तराज महाराज स्वप्नात येणे, त्यांनी ‘आता ते (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि मी एकच आहोत’, असे सांगणे आणि त्यानंतर प.पू. भक्तराज महाराज यांच्या देहत्यागाचे वृत्त समजणे

​या वेळी प.पू. भक्तराज महाराज गोव्यात आले होते. ही त्यांची शेवटची गोवा भेट होती. मला प.पू. बाबांपेक्षा परात्पर गुरु आठवले अधिक जवळचे वाटत असत; मात्र प.पू. बाबांच्या या भेटीत मला त्यांच्याशी अधिक जवळीक वाटू लागली होती. १७.११.१९९५ या दिवशी पहाटे माझ्या स्वप्नात प.पू. भक्तराज महाराज आले आणि म्हणाले, ‘आता ते (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि मी एकच आहोत.’ काही वेळाने दूरभाषच्या आवाजाने मी जागी झाले. त्या दूरभाषवरून मला प.पू. भक्तराज महाराज यांच्या देहत्यागाचे वृत्त समजले.’

(क्रमशः)

– डॉ. रूपाली भाटकार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ऑगस्ट २०२०)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्यकरतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांतआहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्रदिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिकप्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांनाडोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्ती

भाग 3 वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/450968.html