१. संकेतस्थळाच्या संदर्भातील संख्यात्मक आढावा
१ अ. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्यांची संख्या (नोव्हेंबर २०२०)
२. संकेतस्थळावरील लेख जगातील ९ भाषांमध्ये !
नोव्हेंबर २०२० मध्ये ‘एस्.एस्.आर्.एफ्’च्या संकेतस्थळावर तमिळ, हिंदी, नेपाळी, इटालियन, रशियन, स्पॅनिश, इंडोनेशियन, जर्मन आणि चिनी या ९ भाषांमधील एकूण १५ लेख ठेवण्यात आले.
३. ‘ऑनलाईन’ प्रसार
अ. एस्.एस्.आर्.एफ्.चे ‘फेसबूक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘ट्विटर’, ‘यू ट्यूब’ आणि ‘पिंटरेस्ट’ या सर्व वाहिन्यांच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या २ नवीन जिज्ञासूंनी साधनेला आरंभ केला आहे.
आ. २३ सहस्र ६९३ लोकांनी ‘फेसबूक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘ट्विटर’, ‘यू ट्यूब’ आणि ‘पिंटरेस्ट’ या सर्व वाहिन्यांच्या माध्यमातून एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट दिली.
इ. या सर्व वाहिन्यांची नोव्हेंबर २०२० पर्यंतची एकूण सदस्यसंख्या ३ लाख ५ सहस्र ४५४ आहे.
४. ‘लॉग-इन’ सुविधा
४ अ. ‘एस्.एस्.आर्.एफ्. अब्रॉड लॉग-इन’ सुविधा : या सुविधेच्या अंतर्गत नोव्हेंबर २०२० मध्ये इंग्रजी, फ्रेंच, सर्बियन, जर्मन, स्पॅनिश आणि इंडोनेशियन या ७ भाषांतील वाचकांच्या ९२ प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. या मासात संपर्कात आलेल्या ३ नवीन जिज्ञासूंनी नामजप आणि आध्यात्मिक उपाय चालू केले आहेत.
४ आ. ‘एस्.एस्.आर्.एफ्. भारत लॉग-इन’ सुविधा : या अंतर्गत नोव्हेंबर २०२० मध्ये एकूण ९५ प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. या मासात संपर्कात आलेल्या २ नवीन जिज्ञासूंनी नामजप आणि आध्यात्मिक उपाय चालू केले.
या दोन्ही सुविधांच्या अंतर्गत नोव्हेंबर २०२० मध्ये एकूण १८७ प्रश्नांची उत्तरे देण्यात आली.
५. ‘लाइव्ह चॅट’ (संकेतस्थळाला भेट देणार्या जिज्ञासूंशी संवाद साधण्याचे तंत्रज्ञान)
याद्वारे हिंदी, इंग्रजी, स्पॅनिश, जर्मन, क्रोएशियन, फ्रेंच आणि रशियन या ७ भाषांतील ८७१ वाचकांशी संवाद साधता आला.
६. विविध देशांत घेण्यात आलेली ‘ऑनलाईन’ व्याख्याने आणि कार्यशाळा यांच्या माध्यमातून झालेला व्यापक प्रसार अन् त्यांना जिज्ञासूंचा मिळालेला प्रतिसाद !
नोव्हेंबर २०२० मध्ये अमेरिका आणि कॅनडा येथे इंग्रजी भाषेत; क्रोएशिया, सर्बिया आणि मॅसेडोनिया येथे सर्बियन अन् क्रोएशियन भाषेत; जर्मनी, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड येथे जर्मन भाषेत; इंडोनेशिया येथे इंडोनेशियन भाषेत; युनायटेड किंगड्म, रशिया, फ्रान्स, रोमानिया, हंगेरी, हॉलंड, बेल्जियम, इस्राइल, इस्टोनिया आणि इटली येथे इंग्रजी अन् फ्रेंच या भाषांत; तर बोलिव्हिया, व्हेनेझुएला आणि मेक्सिको येथे स्पॅनिश भाषेत, अशी एकूण ‘ऑनलाइन’ २० व्याख्याने अन् ९ कार्यशाळा घेण्यात आल्या. १० सहस्र ७१६ जिज्ञासूंनी या प्रवचनांचा, तर ५८ जिज्ञासूंनी कार्यशाळांचा लाभ घेतला.
याचबरोबर नोव्हेंबर २०२० मध्ये सद्गुरु सिरियाक वाले यांनी १६, तर पू. रेन्डी इकारांतियो यांनी ६ ऑनलाईन ‘नामजप सत्रे (ग्रुप चँटिंग सेशन्स)’ घेतली. याचा एकूण १४ सहस्र १०१ साधक आणि जिज्ञासू यांनी लाभ घेतला.
७. विविध विभागांत घेण्यात आलेल्या सत्संगांची संख्या
८. एस्.एस्.आर्.एफ्.चे वाचक
अ. एकूण १८९ देशांत ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळाला भेट देणारे वाचक आहेत.
श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता !’
– (सद्गुरु) श्री. सिरियाक वाले, युरोप (डिसेंबर २०२०)