(म्हणे) ‘भगवान परशुराम गोमांसाविना भोजन करत नव्हते !’

तृणमूल काँग्रेसचे नेते मदन मित्रा यांचे संतापजनक विधान

मदन मित्रा यांच्यासारखे जन्महिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी होत ! अशांवर बंगाल पोलीस कारवाई करण्याची शक्यता अल्प असल्याने केंद्र सरकारने याची नोंद घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी !

तृणमूल काँग्रेसचे नेते मदन मित्रा

कोलकाता (बंगाल) – भगवान परशुराम कधीही गोमांसाविना भोजन करत नसत. त्यांना माता सीता स्वतः गोमांस बनवून वाढत असे, असे विधान तृणमूल काँग्रेसचे नेते मदन मित्रा यांनी केले. यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष आशुतोष झा यांनी मित्रा यांच्याविरोधात येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष आशुतोष झा यांनी मित्रा यांच्याविरोधात येथील पोलीस ठाण्यात तक्रार

मित्रा यांनी एका स्थानिक दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रमात एक गोष्ट ऐकवतांना सांगितले की, माता सीता यांना लक्षात आले की, भगवान परशुराम त्यांच्या घरी आले आहेत. तेव्हा त्यांनी गोमांस शिजवण्यास सांगितले. ते गोमांसाविना भोजन करणार नाहीत, असे म्हटले. या वेळी उपस्थित भाजपचे नेते अर्जुन सिंह यांनी मित्रा यांना ‘ममता बॅनर्जी यांनी तुम्हाला ही कथा शिकवली आहे का ?’, असा प्रश्‍न विचारला.